हे मिस्टर डीजे... भाग दोन.

कार्यक्रमाचा दिवस उजाडला.

पुन्नीचा ड्रेस निळे लेगिन्ग व टीशर्ट. त्यावर बांधलेला बर्गरचा थर्माकोल चा कट आउट. व डोक्यात हेअर
बँडला लावलेले फ्रेंच फ्राइजचे पुडके. अनुच्या आईने असेच पिझाचा चतकोर रंगवून लेकीच्या कमरेला बांधायची व्यवस्था केली होती. केसांचा पोनी बांधलेला. मुली शाळेतून बस ने येणार होत्या. मी ऑफिसातून काम उरकून ड्रायव्हरला घेउन गेले.

संध्याकाळची वेळ. चौमोह्ल्ला पॅलेस हा व्हेन्यू. ह्याला आपली अंगचीच एक नजाकत आहे. पॅलेस आहे पण अंगावर येत नाही. साधे हैद्राबादी मुस्लीम आर्किटेक्चर आहे. कमानी कमानीची एक मजली इमारत दोन बाजूने, मध्ये समोर पॅलेसची वास्तू. ह्यात एक मोठा दरबार हॉल व त्यात बैठक. सर्वत्र दिवे झुंबरे ह्याच्या मध्य भागी हिरवळीचा पटटा व एक कारंजे आहे. त्यामुळे आपसूकच गारवा येतो. हिरवळीवर टेबले लावली होती. सर्व बोलावलेले मानकरी प्रिन्सिपाल लोक बसलेले होते. व कबाब, टिक्के सर्व्ह होत होते. हलका वारा वाहात होता. अत्तराचा वास तर आपल्याला येतोच त्यामुळे एकदम सुकून भरे सुगंधी वातावरन होते.

रात्र पडली व सात ला कार्यक्रम सुरू झाला. गणेश वंदना. हिरव्या सिल्कच्या कॉस्चुम मध्ये सुस्मिता
एकदम खुलून दिसत होती. हातात दिवे घेउन हा नाच झाला. मग नवाब व भागमतीची प्रेम कहाणी, बंजारा मुलींचे नृत्य, तेलंग णाचा खास एनर्जॅटिक पर्फॉरमन्स मुलांच्या हातात डफली व घोंगड्या. काठ्या. मिश्या असा ड्रेस . मध्ये मध्ये नॅरेशन होते. निवेदिका वाचत होती शब्द मला पाठच होते. मग खास नवाबासाठी अशी कव्वाली झाली. तेव्हा मधले मोठे झुंबर लावले होते. एकदम मॅजिकल मोमेंट. मग अंधार व नॅरेशनने टाइम लीप घेउन नव्या जमान्याकडे तडक वाटचाल केली.

मडोनाचा लो डीप थ्रो टेड आवाज आला. हे मिस्टर डीजे... व पब्लिक उसळले. एकदम जोशात मुलांचा नाच व रंगीबेरंगी लाइट्स स्टेज वर आले. धमाल धमाल. ह्यानंतर नॅरेशन व
एंडिंगला सर्व मुलांचे ट्रूप्स वंदेमातरमला एक एक करत हजर झाले व शेव्टी वेलकम बोर्ड नीट उलगडला. हुश्श झाले. आभार प्रदर्शनानंतर मुलांचा सहभाग संपला. काही मुले मागे अंधारात भागमतीचे भूत आहे असा वात्रट पणा करत होती. आमचे पिझा बर्गर घेउन आम्ही निघालो.
मी कार मध्ये खायला पुन्नी साठी थोडे कबाब टिशू मध्ये घेतले होते. थकलेले पोर गाडीतच झोपले.
एक छान अनुभव गाठीशी बांधून.

२००७ मध्ये चित्र ड्रामॅटिकली बदलले. फेब मध्ये वीनी घरी आली. मे मध्ये रवी
आम्हाला सोडून गेला. प्रीतीच्या दोन छोट्या मुली पुन्नी पेक्षा लहान. तिचा दुसरा घट स्फोट झाला.
मुलींच्या नावावर इस्टेट करून घेण्याच्या व कस्टडी युद्धात ती पुरी अडकली. कारमध्येच तिचा संसार चालायचा. मुलींच्या साठी कार मध्ये सर्व. पांघरुणे, खाणे पाणी व अभ्यासाची वह्या पुस्तके!! २००८ मध्ये वीनीचे बाळ ह्या घरी गेले प्रिन्स शॅडो व्हेलवेट. स्वीटी आमच्या कडे राहिली.

पंकज सरांनी नवी सांत्रो घेतली ती घेउन येताना अपघात झाला व त्याची बायको संसार अर्ध्यावर सोडून गेली. हे मला प्रीतीकडून कळले. माझा वैयक्तिक काहीच कॉटॅक्ट नव्हता. त्यालाही दोन मुली. दहा वर्शे गेली. सर्वांची ही पेरेंटिंग फेज पार पडली. मुली सज्ञान झाल्या. वीनी गेली २०१६
प्रिन्स नोव्हेंबरमध्ये आईकडे गेला. आम्ही पन्नाशी पाहिली.

ते सुखाचे मॅजिकल क्षण कायम आमच्या सोबत असतीलच. तात्पर्य काय की फाइट युअर पर्सनल बॅटल्स बट एंजॉय द पीस टाइम्स इव्हन मोअर. दे आर रिअली प्रेशस.

हे मिस्टर डीजे पुट अ रेकॉर्ड ऑन आय वॉट टू डान्स विथ माय बेबी.

/* */ //