टोमॅटो एक्लिप्स - कलर्ड पेन्सिल ड्रॉईंग

हाय मैत्रिणींनो,

मागच्या वर्षीपासून पेंडींग असलेलं हे चित्र आता पूर्ण केलं.
CPM म्हणजे कलर्ड पेन्सिल मॅग्झिनतर्फे दर महिन्याला चित्रांची चॅलेंजेस दिली जातात. त्यातल्या २०१६ च्या जुलै महिन्याचं हे चॅलेंज होतं.

फॅबर कॅसल कंपनीच्या क्लासिक आणि पॉलिक्रोमोस तसेच डेरवन्ट कलरसॉफ्ट या ब्रँडच्या पेन्सिल्स मी यात वापरल्यात. कागद साधाच आहे फार जाड नाही. टोमॅटोची स्कीन स्मूथ दिसणे आणि त्यावरील रंगांचे ग्रेडेशनही स्मूथ दिसणे हे फार चॅलेंजींग होते. नाहीतर टोमॅटो की सफरचंद असं होऊ शकते. biggrin

Tomato eclipse.jpg

/* */ //