माऊंट रेनिअर

वणवण गँग बरोबर वणवण करताना माऊंट रेनिअरचा विषय निघाला. त्यावरून माबो वर लिहीलेलं माऊंट रेनिअर भटकंतीचा लेख कोणी फार वाचलन/ बघितला नाहीये हे लक्षात आले :P म्हणून इथे आणते.

a
प्रचि १

माऊंट रेनिअर! - सिअ‍ॅटलच्या स्कायलाईन वर दिसत रहाणारा, किंवा बहुतेक वेळा ढगांच्या पडद्यात गुरफटून नाहीसा होणारा, एखादा ऋषि आपली पांढरीशुभ्र दाढी सोडून तपश्चर्या करत बसल्यागत दिसणारा, पण प्रत्यक्षात आतून खवळणारा ज्वालामुखी उदरात घेऊन वावरणारा तर वरती जवळपास २५ glaciers बाळगून असणारा - १४५०० फूट उंचीचा हा पर्वत!
रेनिअरच्या परिसरात केलेल्या भटकंतीचे हे काही फोटोज नी वृतांत! (२०१४ व २०१५ साली केलेल्या ट्रीप्स मधले हे फोटोज आहेत.)

ऑगस्ट २०१४

ऑगस्ट महिना म्हणजे पार्कात रानफुलांच्या बहरीचा काळ! रंगीबेरंगी फुलांनी बहरलेला पार्क आणि बॅकग्राऊंडवर रेनिअर म्हणजे डोळ्यांना पर्वणीच!

आजतागायत रेनिअरला कायम एक दिवसाची ट्रीप केली होती . यावेळी मात्र घरात चालू असलेल्या कामातून जरा बदल म्हणून २ दिवस कोठेतरी जाऊ असे ठरवून सहज पार्कच्या आतलं पॅरॅडाईस इन चेक केलं - आणि आश्चर्य म्हणजे नेमकं शुक्रवार-शनिवार कोणीतरी आयत्या वेळी cancellation केल्यामुळे आम्हाला बुकिंग मिळालं. नाहीतर पार्कच्या आतल्या लॉजेस ची बुकींग्ज उन्हाळ्यात मिळणं म्हणजे महाकठीण काम!

Paradise Inn
प्रचि २ - पॅरॅडाईज इन

पार्क मधील हा एक धबधबा - नारदा फॉल्स! - हो! नारद मुनींचं नाव या धबधब्याला दिलंय! त्यांच्या नावाची इथे कुठे वर्णी लागली काय ठाऊक!

Narada Falls
प्रचि ३ - नारदा धबधबा

शुक्रवारी संध्याकाळी पार्क मध्ये पोहोचलो - त्या दिवशी आणि दुसर्‍या दिवशीही, मध्येच ढग येऊन रेनिअर साहेबांना झाकून टाकतायत आणि अचानक कोणीतरी पडदा उघडावा तसा ढगांचे आवरण बाजूला होऊन समोर महाराज प्रकट - असा लपाछपीचा खेळ चालू होता!

पॅरॅडाईज पॉईंट हा पार्क मधील सर्वांत पॉप्युलर एरिआ! हजारोंनी पर्यट्क उन्हाळ्यात या भागाला भेट देतात. पॅरॅडाईज भागात - पॅरॅडाईज व्हिजिटर सेंटर च्या परीसरात स्कायलाईन ट्रेल ही साधारण ४.५ मैलाची, रेनिअर ला मिठी मारता येईल अशी जवळ जाणारी लूप ट्रेल आहे - नितांतसुंदर! त्याला अनेक उपफाटे पण आहेत.
सकाळी १० नंतर पर्यटकांची गर्दी चालू झाली की हा ट्रेल प्रचंड बिझी होतो. पण यावेळी मात्र आम्ही शेजारीच राहिल्याने जरा लवकरच ट्रेलवर गेलो. अधे-मधे हलके-फुलके ढग उतरलेत- नजर जाईल तिथे रानफुलांची जत्रा, मध्येच दर्शन देणारा- आणि क्षणात आपल्या डोळ्यादेखत नाहीसा होणारा रेनिअर - अश्या वातावरणात सुमारे २ मैल चालल्यावर धाकट्या चिरंजीवांनी आता (अगदी) बास असे जाहीर केल्यावर मग परतलो. पुढचा ट्रेल बराच स्टीप देखील होता - तो आत्ता राहू देत असं म्हणत परतलो.

प्रचि ४
प्रचि ४

प्रचि ५
प्रचि ५

प्रचि ६
प्रचि ६

प्रचि ७
प्रचि ७

प्रचि ८
प्रचि ८

प्रचि ९

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि १०

प्रचि ११
प्रचि ११

ट्रेलहेड पाशीच हॉटेल असल्याचा फायदा म्हण जे दुपारच्या उन्हात आणि गर्दीच्या वेळात शांतपणे रूमवर जाऊन आडवे झालो! ते संध्याकाळी ६ नंतर परत बाहेर पडलो. जवळ च्या मिर्टल फॉल्स ला चक्कर मारली.

प्रचि १२
प्रचि १२

आदल्या दिवशी स्कायलाईन ट्रेल पूर्ण झाला नाही म्हणून दुसर्‍या दिवशी सकाळी उठून मी आणि मोठे चिरंजीव यांनी तो ट्रेल पूर्ण करायचा ठरवला. सकाळी ७-७.१५ ला आम्ही दुसर्‍या बाजूने त्या ट्रेलला लागलो. काय वर्णावा तो नजारा! मैलोन मैल पसरलेली दरी, तो almighty Rainier, रानफुलांनी नटलेली वाट, सकाळची जादुई वेळ! केवळ स्वप्नात आहोत आपण असं वाटत होतं! Paradise point हे नाव सार्थ असल्याचं पटवून देणारा अनुभव!

प्रचि १३
प्रचि १३

प्रचि १४
प्रचि १४

प्रचि १५
प्रचि १५

प्रचि १६
प्रचि १६

ट्रेलवरून परतेपर्यंत ऊन आणि गर्दी फारच वाढली होती. दुपारी जेऊन आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो तर पॅरॅडाईसला यायला गाड्यांची मैल भर रांग लागलेली!

परतताना मध्ये ह्या reflection lake ला भेट दिली. पण रेनिअर साहेब तोपर्यत परत ढगांचं आवरण चढवून बसलेले. त्यामुळे त्यांचं reflection काही लेक मध्ये दिसलं नाही.

प्रचि १७

प्रचि १७

***********************************************************************
त्यानंतर परत सप्टेंबर २०१५ ला रेनिअरला फॉल ट्रीप केली. पानगळीचे रंग अगदी बहरात होते रेनिअर परिसरात. त्याची फोटोरूपी झलक

a
प्रचि १८

a
प्रचि १९

a
प्रचि २०

a
प्रचि २१

a
प्रचि २२

६ सप्टेंबर, २०२०
लांब वीकांत सत्कारणी लावण्याकरीता माऊंट रेनिअरला "सनराईझ पॉईंट" ला सूर्योदय बघायला गेलो. पहाटे २.३० ला उठून ३.३० ला घराबाहेर पडलो. साधारण ५.४५ ला पोहोचलो.. निम्मा पार्किंग लॉट भरला होता. माऊंट रेनिअरवर सकाळी पडणारे पहिले सूर्यकिरण आणि त्यात न्हाहून निघणारा रेनिअर बघणे - हा सिअ‍ॅटलवासीयांचा आवडता उपक्रम आहे.
तो का ते पुढल्या तासा-दीड तासात कळलंच. हा बघा - सोनेरी रेनिअर!

WhatsApp Image 2020-09-06 at 9.17.14 PM (1).jpeg

WhatsApp Image 2020-09-06 at 9.17.14 PM.jpeg

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle