पायनॅपल राईस

पायनॅपल राईस

साहित्य

१ भांडे बासमती तांदूळ
१/२ भांडे अननसाचे तुकडे ( मी टिन मधला वापरला )
१ कांदा
२ हिरव्या मिरच्या
२ तमालपत्रे
४ लवंग
१ छोटा चमचा लसूण पेस्ट
थोडे गाजराचे तुकडे, भो मि चे तुकडे, आवडीप्रमाणे, आज मी थोडी फरसबी पण ढकलली Heehee

कृती

तांदूळ २०/३० मि धुवून निथळत ठेवले, थोड्या तुपावर एक तमालपत्र घालून परतले, दीड भांडी पाणी वापरले, शिजताना मीठ घातले, यावेळेस टिन मधले पण पाणी घातले, भात शिजल्यावर मोकळं करून गार होऊ दिला.

तेलावर १ तमालपत्र, २ हि मि, ४ लवंगा घालून कांदा परतला, मग गाजर, भो मि चे तुकडे, फरसबी, अननसाचे तुकडे परतले, भाज्या शिजल्यावर भात घातला, चव बघून मीठ घातले,वाढण्यापूर्वी/पॅक करण्यापूर्वी तमालपत्र काढून टाकले.

फोटू नाही काढला, पुढच्या वेळी काढेन, तुम्ही कोणी केलात तर प्लीज अपलोड करा.अजून पण काय सुधारणा करता येईल ते सांगा.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle