अमेरिका भेट - कुठे जाऊ, काय करु?

मी आयुष्यात पहिल्यांदा अमेरिकेला जाणार आहे. शिकागोपासून १ तासाच्या अंतरावर ट्रेनिंग आहे. २५ एप्रिलला ट्रेनिंग संपेल. मग मी २ दिवस् सुट्टी टाकली आहे.
२५ एप्रिल संध्याकाळ ते २९ एप्रिल असा फिरण्यासाठी वेळ आहे माझ्याकडे. ३० एप्रिलला भारतात परत यायचे आहे.
मी एकटीच फिरणार आहे.
तर कुठे जाऊ, कशी जाऊ, काय बघू? कुठले मुख्य पटेल पॉईंट्स बघु? कितीही सुरक्शित शहर असेल तरी कुठलातरी भाग असुरक्शित असतो. तो कसा शोधू आणि टाळू?

महत्वाच्या गोष्टी:
१. मी रुपयात कमवते. रोजचा विमान प्रवास खूप महाग पडेल. त्यामुळे एकाच ठिकाणी जाऊन राहुन जवळपासचे बघायचे असा विचार आहे.
२. मला उलटे ड्रायविंग येत नाही. त्यामुळे कार भाड्याने घेणे हा पर्याय नाही माझ्यासाठी.
३. नॅचरल हिस्टरी म्युझियम, सायंन्स म्युझियम, झू, अ‍ॅक्वेरिअम वगैरे, जे लंडनसारखेच असण्याची शक्यता आहे, बघायचे नाही मला.

भरपूर सल्ले द्या.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle