पपईचे लाडू

खरंतर आईकडून ओळख पाहू हा पदार्थ कोणता असले मेसेज फारसे येत नाहीत. त्यात परत आईला फार वेळ लावणारे पदार्थ करता येत असले तरी ती त्याच्या वाटेला जात नाही. आज दुपारी तिने असाच फोटो पाठवला आणि विचारलं ओळख हा लाडू कशाचा असेल. रंगावरून केशरी दिसणारा, बेसनाचा नक्कीच नाही, मग अजून कशाचा असू शकेल, थोडा चमकत होता, मग तिला विचारलं मोती चूर? त्यावर तिचा भला मोठ्ठ नाही आला, मग पुरीचा लाडू विचारला. (पुऱ्या कडक तळून त्याचा चुरा करून पाकातला लाडू, त्यालाही ती नाही म्हणाली, शेवटी मी फोन केला तर हसत हसत म्हणाली पपईचा लाडू...
पपई आणि लाडू या कल्पनेनेच मी फुटले, आई काहीही काय? पण कसे केले असतील ही उत्सुकता देखील वाटली. पपईचा मिक्सरमध्ये ज्यूस करून घ्यायचा, पाणी न घालता, जेवढा तो पल्प आहे, तेवढीच साखर घालून थोड्याशा तुपावर हे मिश्रण आळवत राहायचं. जरा घट्ट होत आलं की त्यात सुक्या खोबऱ्याचा किस घालून आईने ते लाडू वळून घेतले. चव कशी लागली माहीत नाही कारण लाडू अहमदनगर मध्ये आहेत आणि मी बेंगलोर मध्ये.

माझे बाबा पपई खात नाहीत, आणि आईला पपई एकटीला संपवता येत नाही, त्यामुळे तिने हा असा मधला मार्ग शोधून काढला...

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle