लता सप्तशति २: फैली हुई है सपनों की बाहें

कधी कधी जगण्याचे ओझे असह्य होते. विचार चक्रे फिरत राहतात, शारीरीक मेहनत, कामामधील टेन्शन, घरातले नाजूक ताण तणाव सर्व साचून येते. सगळे एकाजागी बांधून ठेवण्यात शक्ती, उर्जा खर्च होते आणि अगदी थोडा वेळ का होईना ह्या सर्वांपासून दूर जावं असं वाटू लागतं . ढोर मेहनत करणारा, हातावर पोट असलेला हमाल असू दे कि करोडोंची उलाढाल सुपरवाइज करणारी इन्वेस्ट मेंट बँकर अँड ऑल ऑफ अस इन बिटवीन, सर्वाना ही एक छोटीशी पळ काढायची संधी निसर्गाने दिलेली आहे. पण काही नशीबवानच ती पूर्ण उपभोगू शकतात.

निद्राराणी कधी मेहरबान होईल म्हणून कावलेला मेंदू वाट बघत चक्रात फिरत राहतो. तेव्हा लतेचे हे गाणे आपल्याला हळू हळू जोजवत शांत करते. चित्रपट आहे हाउस नंबर ४४ साहिर लुधियानवी ह्यांचे शब्द आहेत व एस डी दा ह्यांचे संगीत. अलवार सतारीची सुरुवात व मग शब्द ही तितकेच हलके हलके येतात. इथे ही एक लाडीक ओपनिंग आलाप आहे. प्रत्येक वेळी संगीत आपल्यावर दाण दाण आदळायची गरज नसते. कधी कधी एखादी बारकी तान विषयाला अनुरूप अशी घातल्यास जास्त परिणामकारक होते. एस्डीं सारख्या सिद्धहस्त कंपोजर कडूनही हे रिस्ट्रेंट आपण शिकू शकतो.

फैली हुई है सपनों की बाहें आ जा चलदें कहीं दूर
वही मेरी मंजील वोही तेरी राहें आजा चल दें कहीं दूर.

उंधी घटाके साये तले छुप जाए
धुंदली फिजा में कुछ खोये कुच्छ पाये

सांसो की लय पर कोई ऐसी धुन गाये
दे दे जो दिल को दिल की पनाहें

आजा चल दे कहीं दूर.

आता एक देखणी तान आहे.

आपण हे कॄर जग जरासे दूर ठेवून स्वप्नांच्या राज्यातच राहु या.
इंद्रधनुष्याचा झोपाळा करून खेळू, तार्‍यां पर्यंत भरारी घेउ. सारी दु:खे विसरून जाउ थोडा वेळ
मागे वळून पाहुयाच नको. ही स्वप्ने जागे पणी आपण बघतो आहोत का निद्रेत माझ्या लक्षात येत नाही ये, हे प्रियकरा तुझ्याबरोबर राहण्याची स्वप्ने मला जागेपणी पण पडत असतात. तुझ्या बरोबर सारेजीवनच एक मोहनिद्रा होईल. केवळ स्वप्नवत.

झूला धनक का धीरे धीरे हम झूले.
अंबर तो क्या है तारों के भी लब छुले.

मस्ती में झूमे और सभी गम भूले.
देखे न पूछे मुडके निगाहें

आजा चल दे कहीं दूर.

हे सुरांची राणी, तुझ्यामुळे आमचे दु:खी कष्टी जीवन थोडे सुसह्य झाले आहे. कराल सत्यांच्या बरोबरीने जगताना थोडे स्वप्नांचे अस्तर लावुन आम्ही फाटलेले वस्त्र सांधतो.

अश्विनी खाडीलकर.

=====================================

व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहे. सर्व लेखांची शीर्शके तुम्हाल सर्च मध्ये टाकता येतिल अशीच दिली आहेत.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle