अशक्यही शक्य करतील स्वामी......

अशक्यही शक्य करतील स्वामी......

तिसरा महिना संपायला फक्त तीन दिवस बाकी होते...उलट्या चा रतीब होताच म्हणुन doctor कडे गेले.. सोबत बाळाची ताई होतीच.(माझी लेक वयवर्षे 6)

काही issues वाटत आहेत आपण sonography करू आत्ताच.....Dr. गुप्ते

आता अस्मीला कस सांगू....तीचे भन्नाट प्रश्न..असे विचारचक्र सुरु झाले.
तपासणी सुरू झाली आणि स्क्रिनवर काही मिलीमीटरचं एक पिटुकलं अक्षरश: अर्ध्या सेकंदाला एक दोलन या हिशेबाने स्प्रिंगसारखं झुलत होतं.
अजून सहा-साडेसहा महिन्यांनी हे गाठोडं आपल्या हातात असेल या जाणिवेनीच आनंदानं शहारायला झालं!
पण low lying placenta होता म्हणून bedrest सुद्धा सांगितली गेली...
लगेचच big sister चे प्रश्न सुरु झाले!
" मम्मा, बाळ पोटात कसे गेले? पोटातून बोलेल का माझ्याशी? त्याला माझा आवाज जाईल का?
असे खूप...
तिने खूप maturedly accept केले आणि त्या दिवशीपासून माझी खूप काळजी करु लागली! ऋणानुबंध दुसरे काय!

नवरादेखील महागातमहाग अर्थात बेस्ट treatment मिळेल याची तरतूद करत होता..

पुढे दर आठवडा-पंधरा दिवसांनी वेगवेगळ्या तपासण्यांसाठी हॉस्पिटलला चक्कर होत होती. त्यात मला प्रसुतीपुर्व मधुमेह सुरू झाल्याचं निदर्शनास आलं.वजन सुमारे १६ किलोनी वाढले होते ...६व्या महिन्यातच...मग दिवसातून तीन वेळा रक्तातली साखर तपासणं सुरू झालं. त्यावरची औषधं, आहार आणि व्यायाम यांचं गणित बसू लागलं. भात आणि गोड हे स्वप्नात फक्त!

प्रत्येक महिन्यात काहीं ना काहीं होत होते... काहीशी भीती बसली होती मनात...त्यात Google वरुन अभ्यास सुरू ठेवलेला..अर्धवट doctor झाले पण होते...

हळू हळू placenta च्या स्थितीत सुधारणा दिसत होती तसा थोडा walk आणि योगा चालु केला!

नवऱ्याच्या अनुपस्थितित आईचे लक्ष होतेच जातीने!
डोहाळे पुरवणे, माझ्या चोरून गोड खाण्यावर लक्ष ठेवणे, अस्मीला entertain करणे ,योगा करून घेणे,
walk ला सोबत करणे, रामरक्षा न चुकता म्हणणे आणि गोलगरगारित पोटाला स्वामींचा आंगरा लावणे! सगळेच कसे cute!

एव्हाना आठवा महिना संपत आलेला. पोटाचा घेर ब-यापैकी वाढलेला. त्यामुळे रात्री झोपताना श्वास घ्यायला जड व्हायचं. मग अंगाखाली पाच सहा उशांचं जुगाड! कुस बदलणे हे फार मोठे काम वाटायचे..जेमतेम झोप व्हायची. मानसिक अवस्था तर भारीच एकदम...
'कसतरी' व्हायच...पण हे 'कसतरी' समजुन घेणारे भेटले............हेही नसे थोडके!

Tinysteps या parenting app वर भेट झालेल्या सख्या! कधीही काहीही विचारा ..मनाची अवस्था नेहमी समजून घेणार! खरचं! कधी कधी न बघितेल्या व्यक्ती सुद्धा किती जवळच्या होऊन जातात! पुढे खुप वेळा भेट झाली हे सांगायला नकोच!
Poorna माझा तेलगू मित्र! भन्नाट डोक्याचा आणि विचारांचा हा माणूस कधीही माझ्याकरता available! अगदी रात्री २ वाजताही! my best buddy and companion! Some brains work alike!
जेव्हा गरज असते तेव्हा हाक न मारता हजर असलेल्यापैकीं एक!
तशीच ऐश्वर्या...तिची आठवण यावी आणि तिचा message हजर!

स्वामीकृपाच....

आता ९वा महिना अर्धा समाप्त..baby कधी येणार... मग boy असेल का girl .... big sister!
आम्ही सगळे जोरदार तयारी करत होतो!

२१मार्च माझा वाढदिवस! सकाळपासून फोनवर फोन आणि message! पण खूप अस्वस्थ वाटत होते..
बारीक डोके दुखत होते..कसलीतरी भीती वाटत होती रात्रभर झोप नाही आली... 22 मार्चला appointment होतीच...तेव्हा मी फार कोणाला नाही सांगितले....

२२तारखेला सकाळीच गुप्ते गाठले! "blood pressure shootup झालेय admit व्हा आजच..आपल्याला लवकरच डिलिव्हरी करावी लागेल"...Dr.गुप्ते.

मी नोर्मल डिलिव्हरीचीच इछा दाखवली त्याला doctor नी सुद्धा green signal दाखवला अर्थात बाकी condition चा विचार करुनच!
दवाखान्यात अॅडमीट झाल्यानंतरही कळा नव्हत्याच. तशी तारीख ६ एप्रिल होती...त्यामुळे इंजक्शन देऊन कळा सुरू करायचं ठरवलं. दर काही तासांनी बाळाचे ठोके तपासले जात होते.
आता हळूहळू कळांचा जोर वाढत चालला होता..
पण म्हणाव तशी development नव्हती...
आपण ६.३० पर्यंत वाट पाहू नाहीतर सीझर करावे लागेल...doctor बोलले.कारण अजून एक प्रोब्लेम म्हणजे नाळेचे ३ लूप बाळाच्या गळ्याला होते...त्यामुळे बाळ खाली सरकु शकत नव्हते....

माझी सिझरसाठी तयारी नव्हती, मग स्वामींना स्मरून सांगितले.
आणि पुढील सर्व गोष्टी सहज घडल्या....केवळ willpower मुळे... O.T मध्ये नेले गेले.

आता प्रसूती तासभरात होणार असे कळल्यावर लगेच बहिणीने साजुक तुपात पोहणारा बदाम शीरा करून आणला घरून! आदल्या गुरुवारी स्वामींना शीराच नैवैद्य म्हणुन दाखवला होता मी..
बाहेर आईची रामरक्षा , स्वामी तारक मंत्र यांची पारायण चालू होतीच..आणि अश्रूंचीही...

Dr.संजय गुप्ते मला त्यावेळी स्वामिंसारखे भासले..ज्यानी ३3 वर्षांपूर्वी माझा जन्म केला तेच माझ्या बाळाचा जन्म करणाऱ होते..! (मुलीच्यावेळी ते out of India होते)

"बस बेटा आता थोडे सहन कर... १५/२० मिनिटे..And your baby will be here!!" ते शांतपणे माझ्या डोक्यावर हात ठेवून बोलले!
त्यांच्या बोलण्यामुळे जरा धीर आला, आता प्रचंड अश्या कळा येत होत्या....माझी शुद्ध हरपत होती...

"Breathe in and out....and Final push" ....
Nurses, Assistant doctors and Dr.Gupte...

O.T मधल्या त्या प्रखर दिव्यामुळे डोळे दिपत होते....
मी डोळे घट्ट मिटले....एक जोरदार कळ...
तेवढ्यात ....Congratulations! its a baby boy! Doctor नी अभिनंदन केले! वेळ रात्री ७.47 .

तो गुरुवार होता ! स्वामींचा!

इतके दिवस एकुलती एक असलेल्या अस्मीला 'ताई'ची हक्काची बढती मिळाली!
बाळाला पाहिल्यावर लगेच आम्ही ठरविलेले नाव तिने त्याच्या कानात सांगितले!

आहान - सूर्याचा पहिला किरण !

आहानचे पहिलंवहिलं पालथं पडणं, बसणं, पुढं सरकणं, तोल सांभाळत उभं राहणं, पावलं टाकणं आणि आता क्षणभरही उसंत घेतली तर शिक्षा होईल जणू या अविर्भावात कधी राजरोसपणे तर कधी नजर चुकवून अनेक उद्योग करून ठेवणं...

तीन महिन्यांच्या सोनोग्राफीत दिसलेला तोच अखंड उर्जास्त्रोत कायम असलेलं, सतत कार्यमग्न आमचं पुत्ररत्न बघताबघता आज ऐक वर्षांचं झालं...

आहान तुला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

एकंदरच वाढत्या वयाबरोबर आजूबाजूला घडणा-या गोष्टींबद्दलचे कुतुहल आणि ते शमवण्यासाठी होणारे वाढते कारभार हे ओघानं आलंच! त्यामुळे या सदस्याला आजुबाजूच्या जगाला आपल्याभोवतीच कसं घुटमळत बांधून ठेवावं हे बरोबर कळतंय...

आणि सर्वात सुंदर क्षण म्हणजे अस्मी आणि आहान याना एकत्र खेळताना पहाणे..! असे वाटते की यासाठीच केला होता अट्टाहास!

अर्थात ह्या आनंदाच्या बोनसपुढे जगातल्या सगळ्याच गोष्टी फिक्या का असतात याचा अनुभव आम्ही घेतोय हे नक्की!

-अवंती पुंडे - धर्माधिकारी

Keywords: 

मातृत्व व पालकत्व: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle