छाया शिल्प

(जपान मधे एका म्युझियम मधे एक मोठा दगड ठेवलाय. ज्यावर माणसाची आकृती कोरली गेलीय. अणुबाँब पडला तेव्हा तो माणूस त्या आगीत क्षणात जळून गेला. दगडही जळला पण त्या माणसाचीची सावली पडलेला दगडही कमी जळला कारण त्या क्षणभरातली त्या माणसाची सावली.)

दिक्कालाचे एकच शिल्प,
मी उभा कधीचा त्या दगडाशी

मी उभा कधीचा त्या दगडाशी,
चालत होतो वाट जराशी
समोर होते कार्यालय अन,
उतरलो बस थांब्यापाशी
धावधाऊनी वेळ पाळण्या,
बॅग घेऊनी उरापाशी
फक्त होता मधे एक तो,
रस्ता ओलांडून जाण्यासाठी!

तिथेच उभा मी दगडापाशी,
वाट पाहत सिग्नलपाशी
तेव्हढ्यातच पण पहा आकाशी,
शतसूर्यांचा लखलखाट होई
कल्लोळ उठे गगनांतरी,
लाही लाही साऱ्या शरीरी
शरीर कुठले, नुरले आता,
कोरीव छाया मागे उरली!

उभा कधीचा त्या दगडातच,
मी न, नुसती कोरीव छाया!

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle