एक विलक्षण अनुभव - होमलेस किड्स कॅम्प - भाग २

ओळख झाल्यावर आता कामाचं स्वरुप समजावण्यात आलं. सकाळी मुलांना बसमधून रिसिव्ह करायचं जोरदार उत्साहात स्वागत करायचं आणि ब्रेकफास्टला पाठवायचं. स्टुडंट सर्विसेसची असिस्टंट सुपरीटेंडंट ह्याची मेन प्लॅनर आणि ऑर्गनायझर होती. प्रचंड उत्साही बाई. प्रत्येक निवडलेला कँडीडेट एक वेगळी पर्सनॅलिटी घेऊन आला होता. सगळ्यांचं ध्येय एकच. या मुलांना आनंदात ठेवायचं आणि त्यांना वेगळाच
स्प्रिंग ब्रेक अनुभवू द्यायचा. हे सगळं विलक्षण होतं.

ह्या आधी स्प्रिंग ब्रेक सुरु व्हायच्या आधीच्या शुक्रवारी सकाळी प्रिन्सिपल मला म्हणाला आज एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी तर एका जागी रहा. मी एरवी स्कूलमधे सगळीकडे वॉक करत असते, ग्रुप पुल करत असते त्यामुळे वॉकी नसेल तर माझ्याजवळ तर मला शोधायला नाकीनऊ येतात असं प्रिन्सिपल गमतीत म्हणतो. :) तरी मी फिफ्थ ग्रेडच्या राऊंडला गेले आणि मला बाहेर पडताना प्रिन्सिपल आणि स्कूल सुपरिटेंडंट भेटले. तो मला थँक्स म्हणायला आला होता. तोवर मला मी काय कमीट केलंय ह्याची कल्पना नव्हती. आता ह्या मिटींगला आल्यावर त्याची कल्पना आली.

रोजचं रुटीन ब्रेकफास्टनंतर टीम बिल्डिंग आणि मग पुढचं स्केजूल आखलेलं होतं.रोजचं लंच वेगवेगळ्या रेस्टारंटस मधून डोनेट होणार होतं. लंच नंतर मुलांना वेगवेगळ्या भेटी मिळणार होत्या.असं काहीसं स्वरुप कळालं आणि मग आम्हाला आमच्या रुम्स सेट अप करायला पाठवलं.मी माझ्या टिमला सांगितलं 'स्मॉल ग्रुप सेट अप करा आणि मधे फ्लोअर अ‍ॅक्टीविटिजला जागा ठेवा.' ह्या मुलांची अ‍ॅकॅडमीक लेवल अ‍ॅट रिस्क लेव्हल असल्यामुळे त्यांना कंफर्टेबल वाटणं जरुरी होतं. रुम सेट करुन झाल्यावर आम्हाला एक टूर देण्यात आली. एका मोठ्या मिडलस्कूल मधे हा कँप होता त्यामुळे अ‍ॅक्टीविटीजना कुठे जायचं हे माहिती करुन दिलं गेलं.आता परत टीमशी कनेक्ट करायला वेळ दिला. मॅथ टीम सॉलीड होती.सगळ्यांचा उत्साह सळसळत होता.आता ड्रेस कोड समजावला गेला. आम्हाला अत्यंत साध्या कपड्यात यायची सूचना दिली गेली. जीन्स आणि ब्राईट कलरचे टॉप.प्रत्येक दिवसाचा एक कलर सांगितला गेला. टेनीस शूज कंपल्सरी. हे कशासाठी मला कळेना. एक जण म्हणाला कळेल तुला उद्या.मी रोज वेजीज घालणारी आता टेनीस शूज म्हणजे, मला ओळखणारे हसायला लागले.असं मजेमजेत एक उत्साह घेऊन मी घरी परत आले.

दिवस पहिला -सकाळ

पाचलाच उठले. काय शिकवायचं आहे त्याचा आढावा घेतला आणि तयारीला लागले. साडेसातला पोचायचं होतं. साडेसात ते आठ मिटींग झाली आणि बसेस यायला सुरुवात झाली.प्रत्येक बसला दोन वेलकम करणारे टीचर्स असाईन केले गेले होते. एकेक बस अनलोड व्हायला लागली.माझी आणि ट्रिशाची बस शेवटी येणार होती. काही मुलं बिचकत, काही उत्साहात तर काही बेदरकारपणे उतरत होती. माझ्या स्कूलची मुलं मला बघून धावत येत मला हग करुन जात होती. एक माझ्या स्कूलची अनाया मात्र मला सोडून हलेना. तिला ब्रेकफास्टला जायचा आग्र्ह केला पण तिला मला सोडून जायचं नव्हतं.बाकी कॅफेटेरीयात मात्र आरडाओरडा,म्युझीक सुरु होतं. ८ व्या ग्रेडला शिकवणारा क्रिस ह्या जोरदार स्वागताचा सोर्स होता. प्रत्येक मुलाचं/ मुलीचं असं स्वागत केलं जात होतं की त्यांना वाटावं हा कँप केवळ त्यांच्याच साठी ऑर्गनाईज करण्यात आलाय. आमची बस आल्यावर अनायाला घेऊन आम्ही आत गेलो. खूप दंगा, मस्ती, आरडाओरडी केल्यावर आम्ही ब्रेकफास्ट रुममधून हललो.

आता टीम बिल्डींग अ‍ॅक्टीविटी होती. मेमरी गेमसारखा खूप छान गेम क्रिसने ऑर्गनाईज केला होता.
टीचर्सनाही त्यात सामील व्हायला लावलं.टीचर्सनी भाग घेतल्यामुळे मुलांची छान ओळख तिथेच झाली. आईसब्रेकर सारखं. आणि मजा म्हणजे टीचर्स पण विसरु शकतात हे पाहिल्यामुळे आमची इमेज कूल म्हणून झाली. फार पॉवरफूल सेशन होतं हे.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle