एक विलक्षण अनुभव - होमलेस किड्स कॅम्प - भाग ३

आता मेमरी गेमबद्द्ल सांगते-
क्रिसची कामाची स्टाईल एकदम मस्त आहे. बोलता बोलता कन्विन्स करेल, हसवेल, हसेल आणि मुलं हाताबाहेर जायला लागली की हळूवार समज देईल. तर आम्हाला एका सर्कलमधे उभं केलं. ओळख करुन द्यायला लावली. नंतर प्रत्येकाने आपली एक सिग्नेचर मुव्ह प्रेझेंट केली. सर्कलमधे ज्याने तुम्हाला पॉईंट आऊट केलं त्याची मुव्ह तुम्ही करायची आणि मग स्वत:ची.जर चुकलं तर एक स्टेप मुव्ह करायची आणि ती ज्याची जागा होती त्याची मुव्ह तुमची.इतका गोंधळ उडत होता आणि तरी मुलं जाम एन्जॉय करत होती आणि आम्हीही. टीचर्स इतके कूल होऊन खेळताहेत ह्याची मुलांना पण गंमत वाटत होती. आमच्या ग्रुपचा गोंधळ आणि आवाज वाढला त्यामुळे क्रिसने येऊन दम भरला :) एव्हाना मुलं एकमेकांना म्हणत होती' आय होप दिज आर आवर टीचर्स'. तोवर रॉस्टर्स दिले नव्हते.मग स्नॅक ब्रेक झाला. फ्रुट स्नॅक,ज्युस होते. ते पाहून मुलांचे डोळे चमकले आणि एक म्हणाला 'आय नेव्हर हॅड दिज इन माय लाइफ' आम्ही सगळे पटकन वास्तवात आलो Sad अक्षरशः पोटात तुटलं.

मुलांचं खाणं सुरु असताना आम्हाला रॉस्टर्स दिले गेले. प्रत्येकीला पाच मुलं दिली गेली.आम्ही आता क्लासरुमकडे जायला निघालो.मी शक्यतो गप्पा मारत आईस ब्रेक करते.ह्या मुलांचा अंदाज येत नव्हता.कशा प्रकारे ते सध्या रहाताहेत हे माहिती नव्हतं. मग असाच माझ्या मुलांचा विषय काढला आणि तीन मुलांची कळी खुलली. एव्हाना माझ्या क्लासमधे येऊन पोचलो. मी सगळ्यांना फोल्डर्स देऊन, मार्कर देऊन डेकोरेट करा सांगितलं ( तीन मिनिटांसाठी)तर त्यांचे डोळे विस्फारले. 'इन मॅथ क्लास?' म्हटलं हो ज्याचा फोल्डर आवडेल त्याला स्मेली मार्कर्स बक्षीस. मन लावून तीन मिनिटं डेकोरेशन सुरु होतं.मी त्यावरून साधारण पर्सनॅलिटीचा अंदाज घेत होते.तीन मिनिटं झाल्यावर सहज सांगितलं' आय लाईक ऑल ऑफ देम. मार्कर इज युअर्स'.त्या क्षणाला जो आनंद मला त्यांच्या चेहेर्‍यावर दिसलाय त्याचं मी वर्णन करुच शकत नाही. आता मुलं मॅथला तयार झाली होती.फार फार स्ट्र्गलींग लेवलला होती. त्यामुळे ऐनवेळी लेसन बदलून फ्रॅक्शन गेम सुरु केला आणि गेमच्या द्वारे फ्रॅक्शन शिकवायला सुरु केलं.अधून मधून जॅकचं बिहेविअर वरती येत होतं.थोडं दुर्लक्ष करत माझा लेसन सुरु ठेवला.बाकीची मुलं काम करताना हलकेच जॅकशी संवाद साधला.' आय गेट इन ट्र्बल अ लॉट इन स्कूल' मी विचारलं ' इज इट बिकॉज यु डोन्ट अंडरस्टँड, 'मी विचारलं. माझा अंदाज खरा ठरला. स्वत:चा विकनेस लपवायला तो बिहेविअरचा उपयोग करत होता.'विल यु हेल्प मी ?त्याने मनापासून विचारलं.'ऑफकोर्स, दॅट्स व्हाय यु आर इन माय क्लास ' माझं उत्तर ऐकून त्याला काय वाटलं मला माहिती नाही पण पुढचे तीन दिवस मला त्याच्या बिहेविअरचा काही अंश दिसला नाही.

एक- दीड तास कसा गेला ते कळालंही नाही.
लंच टाइममधे आज टेक्सास रोड हाऊसच्या चिकन स्ट्रिप्स आणि केक होतं. काय मुलांनी एन्जॉय केलंय.आणखीन मजा म्हणजे लंच टाइममधेच भरपूर गिफ्ट वाटल्या गेल्या. मग मुलांना मधे डान्सला बोलावलं. काय धमाल केली मुलांनी.सतत मुलांना हसवत ठेवणं, त्यांना आनंदात ठेवणं हा ह्या कँपचा गाभा होता.लंचनंतर एक तास परत मुलांना टीम बिल्डिंग आणि गेम्स,बाहेर पळापळी अशी एक तास मजा करु दिली.आणि शेवटचा एक तास परत मॅथ लेसन होता. आता मुलांशी छान गट्टी जमली होती. त्यामुळे शेवटच्या एका तासात आम्ही एक प्रॉब्लेम आणि एक ब्रेन ब्रेक असं करत करत केवढा अभ्यास केला :) मुलं मला म्हणाली ' यु आर ट्रिकी :) यु मेक अस वर्क बट इट डझन्ट फिल लाईक वर्क'.आजचा फ्रॅक्शन लेसन यशस्वी झाला होता आणि त्याही पेक्षा पाचही मुलांशी माझं छान रिलेशन डेवलप झालं होतं.
डेना बसमधे बसताना मला हळूच म्हणाली' आय एम ग्लॅड आय केम. आय हॅड नंथींग टू डू अ‍ॅट होम'हे वाक्य माझी लेकही खूपदा म्हणते पण आज डेनाच्या त्या वाक्याला केवढातरी अर्थ होता आणि त्याने मी अस्वस्थता घेऊन घरी आले.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle