लता सप्तशति:६: इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात.

सुहाना मौसम है, पसीने छूट रहे हैं लेकिन तैरकर कलेजेको ठंडक पहुंचानेका सामान भी रेडी है.
नव्या कळ्या फुलू लागल्यात, वसंताचे आगमन मनाला सुखवून टाकते आहे. आतून एक निखळ आनंदाची खुमारी शरीर मनाला बहर आणते आहे. जीवन हे उपभोगण्यासाठी आहे. सर्व सुखे लुट ण्या साठी आपल्या पुढे हात जोडून उभी आहेत. मग हा नकार का बर. चला आपली सर्व इन्हिबिशन्स सोडा आणि जीवनसागरात डुबकी घ्या. सूर मारा, सर्फ करा .... क्युंकी

इस दुनिया मे जीना है तो सुनलो मेरी बात.
गम छोडके मनाओ रंगरेली. और मानलो जो कहे किटी केली.

जीना उसका जीना है जो हंसते गाते जीले.
जुल्फों की घन घोर घटा में नैन के सागर पीले.

जो करना है आजही करलो कल को किसने देखा
आई है रंगीन बहारें ले के दिन रंगीले.

मैं अलबेली चिनगारी हूं नाचुं और लहराउं
दामन दामन फूल खिलाउं और खुशियां बरसाउं.

दुनियावालों तुम क्या जानों जीने की ये बातें
आओ मेरे मंझर में तो ये बाते समझाउ.

जो भि होगा हम देखेंगे गमसे क्युं घबराये.
इस दुनियाके बाग में लाखो पंछी आये जाये

ऐश केबंदो ऐश करो तुम छोडो ये खामोशी.
लोग उडे तो जिंदा दिल है कर बैठे जो चाहे.

परफेक्ट ऊन, आणि मॉव्ह व व्हाइट अश्या कूलिंग रंगातला वन पीस सूट घातलेली हसरी नाचरी हेलन. मागे समुद्राच्या लाटा, वाळू. अगदी बीच पार्टीचा माहौल जमून आला आहे.
पुढचा मागचा फारसा विचार न करता आलेला क्षण आनंदात मौजेत घालवावा. शराब, शबाब, कबाब जीवन शैली काही दिवस अंगीकारून त्याचे सूख अनुभवावे. फार पंचाइती करू नये.
अशी कायशी फन मजेची फिलॉसोफी सांगणारे हलके फुलके मदमस्त गाणे. हेलनच्या अंगातच लय आहे. व सुरेख गोर्‍या रंगाची ही महबुबा नुसता पदन्यास करते तो ही तालातच.

लताचे हे गाणे तसे हाय पिच मध्येच आहे. पण तो पिच कुठे अंगावर येत नाही. शंकर जयकिशन ह्यांनी वेस्टर्न ड्रम्स वगैरे न वापरता तबला ढोलकी ठेकाच वापरले आहे. गाणे जरी वेस्टर्न लेव्हलचे असले तरी. हेलन ला ह्या चित्रपटा साठी बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेसचे फिल्म फेअर बक्षिस मिळाले आहे. लता म्हणजे कायम गंभीर, भावन प्रधान देवा धर्माची गाणी प्रेमाची रडकी हळूवार गाणी हा गैर्समज पुसून टाकणारे हे एक फन साँग आहे. मला नेहमी वाटते वेस्टर्न सिंगर्सचे नेहमी रूप
प्रेझेंटेशन स्किल्स, नाचायचे स्किल्स ह्यावर जास्त भर असलेले पर्फॉर्मन्स एका बाजूला आणि आपली स्टुडिओत गाउन घरी परत जाणारी लता एका बाजूला. पण शीअर व्होकल रेंज बघितली तर लताला मिळालेली प्रसिद्धी कमीच आहे. त्यात ती गायची तेव्हा तंत्रज्ञान एव्ढे प्रगत नव्हते. ऑटोट्यून वगैरे प्रकार नव्हते. लाइव रेकॉर्डिंग, स्टुडिओत कमाल करणारे खरे आर्टिस्ट असा मामला होता.
१९६५ मधले हे गाणे आजही एखाद्या समर बीच पार्टी साठी परफेक्ट फिट आहे. गोरे भी नांचने लगेंगे कसमसे.

किटी केलीचा डिलाइट्फुल मेसेज लता एफर्ट लेसली आपल्या पर्यंत पोहोचवते. स्प्रिंग समर ब्रेक साठी माझ्या तर्फे एक पेशकश. एंजॉय लाइफ.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle