एक छोटासा लमहा है .... भाग ४

एक छोटासा लमहा है, जो खत्म नही होता
मैं लाख जलाता हूं, ये भस्म नही होता...

लेकाचा वाढदिवस.... तो लहान असल्यापासून परिस्थिती नसली तरी त्या दिवशी काही ना काही तरी भेटवस्तू ती घ्यायचीच त्याच्यासाठी ...

आता चित्र पालटलं ,हातात बऱ्यापैकी पैसा आला पण वयानुसार हिंडणे ,एकटं बाहेर जाणं बंद झालं ...
सकाळीच बाहेर निघून गेला लेक,भेटताच आलं नाही त्याला ... दिवसभर तो येईल म्हणून वाट पाहिली तिने घरात.

कामात बिझी आहे तुम्ही डायरेक्ट ह्या हॉटेलात पोहचा असा निरोप आला रात्री ... सून नातवंडांसोबत ही पोहचली तिकडे ,तिथे ही तो उशिराच पोहचला पण दिवसभराचा किमान दिसला तरी समोर म्हणून ही खुश ...

हसत खेळत जेवण आटपल , डेझर्ट च्या ऑर्डर्स गेल्या अलमोस्ट बारा वाजले दिवस संपत आला ...हिची घालमेल सुरू कधी बरं लेकाला काही गिफ्ट देता येईल ...

इतक्यात सुनेने जाहीर केलं की तिने त्याला काहीच गिफ्ट घेतलं नाहीय पुढच्या महिन्यात बाकीच्या लोकांचे वाढदिवस आहेत तर त्यांच्या सोबत एकत्रच गिफ्ट घेईल ...
त्याने ही ठीक आहे म्हणत मुंडी हलवली ...
आईने गपचूप लेकाच्या हातात पाकीट सरकवले तुला हवं ते गिफ्ट घे म्हणत ...

वीज कोसळल्या गत सून ताडकन उठली नी समोरच सगळं उडवत हॉटेलबाहेर निघून गेली ...
लेक आईला नको नको ते बोलला ,"तुला काय गरज गिफ्ट द्यायची ?"
"अरे ,विसरला का राजा ?
नेहमी मी आजच्या दिवशीच तर देते ना गिफ्ट"
पण शब्द बाहेर पडलेच नाहीत ...
एक आई आपलं काय चुकलं ?याचा विचार करत बसली इतकंच

अर्चना राणे
26/4/18

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle