अवकाश

कॉलनीत तशी गजबजच,
घरटी बांधून सजवत दिवस महिने वर्षे सरतील.
काडी काडी जोखून पारखून विणून घट्ट बांधलेले घरटे ,घरावर व घराने तिच्यावर केलेले निर्लेप प्रेम अशी अतूट नाती सांभाळत,ती अगदी अलगद सांभाळू शकते स्व चा अवकाश!
देशावर ,कुटुंबावर,आईवडिलांवर,भावंडांवर,शाळेवर,गावावर,समाजावर,सगळ्यांवर माया व प्रेम करायला तिला शिकवलं गेलंय.
आणि अशा समाधानात ती स्व वर देखील तितकेच प्रेम करायला शिकली.या प्रवासात एक छान गोष्ट घडली,अपेक्षा ,उपेक्षा,मान अपमान, सूड, अधिकार गाजवणे,मत्सर,द्वेष या क्षुद्र विचारांचे ओरखडे तिने नितळ मनावर उठुच दिले नाहीत,सुखे आली चवीने जगत निघून गेली,दुःखे आली शाहणे करून निघून गेली,आणि हे ही दिवस जातील या सम विचारामुळे ती सतत तरल राहिली.
नकारात्मक सिरिअल्स पेक्षा सुंदर जग तिला खुणावते,गॉसिप पार्टीज पेक्षा तिला रानवाटा खुणावतात,चमकदार शॉपिंग पेक्षा तिला सुती,रेशीम पोताची साधी वस्त्र खुणावतात,समारंभ अटळ असतात पण आवश्यक तेव्हढाच संवाद साधून मनाचा एकांत कोपरा हवासा वाटतो....
मोजक्याच ,आवश्यक सामानाचे मोकळेढाकळे घरटे,आणि मोकळ्या गप्पांचे मैत्र घरास सजवते.
कुठच्याही क्षणी अवकाशाची व आकाशाची हाक आली की साद व दाद घ्यायला मोकळी !
इतपत स्व चे तंत्र जपता आले की झाले.
मोकळ्या आकाशाखाली वृक्षराजीतील इवल्याशा डहाळीवरील इवलेसे घरटे तिला बांधून ठेवत नाही आणि खुले निळेभोरअसीम आकाश सुद्धा कधी सीमित असत नाहीच!!!
रश्मी भागवत।।

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle