सायकल -सिनेमा

दिग्दर्शक - प्रकाश कुंटे
प्रोड्युसर - अमर पंडीत,संग्राम सुर्वे
कलाकर- भाउ कदम,प्रियदर्शन जाधव,रु(?)शिकेष जोशी,संदेश कुलकर्णी,विद्याधर जोशी,प्रदीप वेलणकर

कथेचा जीव अगदी छोटासा आहे. केशवची (रु.जोशी)प्रिय सायकल चोरीला जाते.ती त्याला त्याच्या आजोबांनी भेट दिलेली असते..अगदी त्याच्या वडिलांनाही न देता नातवाला दिलेली असते.आणि ही गोष्ट अख्ख्या पंचक्रोशीत माहित असते. अगदी आता तो स्व्तः आजोबा झाल्यावर,त्याची नातही आवडीने ही गोष्ट परत परत ऐकत असते.

गावातली एक बडी आसामी(विद्याधर जोशी) एकदा त्याची गम्मत कराय्ची म्हणून त्याच्याकडे जावयासाठी ती सायकल हवी आहे सांगतात.तेव्हाही रु.जोशीने अभिनय छान केलाय.प्रिय वस्तू द्यायची ईच्छा तर नाहीये पण नाही पण म्हणता येत नाही.
एकदा मात्र ती सायकल चोरीला जाते व केशव एकदम हताश होतो.स्वतः ज्योतिषी असून सायकल परत मिळेल का हे विचार्ण्यासाठी दुसर्या ज्योतीष्याकडे जातो.सायकल मिळाल्याशिवाय घरी परत येणार नाही असं सांगून घराबाहेर पडतो.

इकडे चोर गज्या व मंग्या (भाऊ कदम व प्रियदर्शन जाधव) मात्र जिकडे जातील तिकडे सगळे केशवची सायकल त्याच्या पिवळ्या रंगामुळे ओळखतात.आधी गडबडलेले दोघं आम्ही दोघं त्यांचे आत्तेभाऊ आहोत असं सांगून वेळ मारून नेतात.तरी आत्तेभावांना सुद्धा केशव सायकल देणे शक्य नाही अस सगळ्यांच्याच मनात येऊन जातं.मंग्या'आपण सायकल इथेच टाकून पळून जाऊ'असं सतत गज्याला सांगत राहतो.पण एकदा ही 'भाऊ' असल्याची थाप पचल्यावर गज्या बिन्धास्त होतो व सायकल परत द्यायचा वा सोडून पळुन जायचा प्लॅन हाणून पाडतो.

पण केशव कोकणात एक ज्योतिषी व साधा-सरळ,प्रामाणिक माणूस म्हणून माहित असल्याने,ह्या दोघांनाही त्याचे भाऊ म्हणून जो मान-सन्मान मिळत राहतो त्याने दोघे भारावतात.कोकणातली आधीच साधी भोळी माणसं ह्यांच्यावर विश्वास ठेवून ह्यांना आग्रहाने,प्रेमाने खायला प्यायला घालतात,चहावाला यांच्याकडून पैसे घेत नाहएक,एका शाळेत यांना रु.जोशीचे भाऊ म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जातं.

असा मान्सन्मान जो चोर म्हणून अर्थातच त्यांना कधीच मिळाला नसता व भेटणारा प्रत्येकजण त्यांना केशवच्या सायकल प्रेमाची कहाणी सांगत असतो.अशा देवमाणसाची सायकल आपण चोरल्याबद्दल दोघांनाही अपराधी वाटू लागतं.
शेवट काही सस्पेंस नाहीये पण पाहण्यातच मजा आहे.

मला खटकलेल्या काही गोष्टी - १९५८ सालातली गोष्ट दाखवलीये पण एकंदर ते कोकण मला आजचच वाटलं.फक्त सायकल व बैलगाडी दाखवली की झालं कोकण १९५८ मधलं हे चुकीचं वाट्ल.मला वाटत तेव्हाच कोकण आजच्यापेक्षाही दाट झाडी असणारं व जंगल असणार.काहीजणच फक्त कोकणी हेल काढून बोलतान दाखवलेत तर काहीजणं नाही.
शिवाय तेव्हाच्या काळात बायका असं सहजपणे ओसरीवर येत असतील बाहेरच्या पुरुषांसमोर,सुन अशी सासर्यासमोर येत असेल,निमंत्रण दिल्यावर का असेना परपुरूष स्वयंपाकघरात जाऊन घरातल्या बाईसमोरच जेवायला बसत असतील असं वाचल्याचं,पाहिलेलं नाहिये कुठे,कधी.त्या बाहेरच्या व्यक्तीला(संदेश कुलकर्णी) ओसरीवर जेवायला बसवतील असं वाटलेलं.
ह्या २ गोष्टींमुळे कथेला काही फरक पडत नाही,पण १९५८चा काळ दाखवलाय तर हा तेव्हाचा महत्त्वाचा भाग असा कसा दाखवला असं वाटून गेलं.
केशव स्वतःची प्रिय सायकल शोधण्यासाठी काहीही प्रयत्न करताना दाखवला नाहीये.कायम हताश होऊन एका जागी बसलेला.आपली प्रिय वस्तू हरवली तर आपण ४ लोकांना विचारू,कुठल्या जागी जाऊन तिचा शोध घेऊ.केशव
असं काहीही करताना दाखवला नाहीये.

चोर असलेल्या गज्या व मंग्यासमोरच विद्याधर जोशी,'चोर सुद्धा केशव्ची सायकल पळवू शकणार नाहीत' असं म्हण्तात तेव्हा प्रियदर्शनचा चेहरा कोरा ठेवण्याचा प्रयत्न भाऊ कदमच फिस्कन हसणं दोन्ही जमून आलय.

एकंदर सिनेमा वन टाईम वॉच आहे व लहान मुलांनाही आवडेल असा आहे.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle