मँगो केक

ह्या रेसिपीची मी खुप मोठी फॅन आहे. आग्रहाने खायला घालून खुप लोकांना खुष केलेय. मी प्रथम खाल्ला ते मैत्रिणीच्या घरी आणि तिच्या ब्लॉगवर रेसिपी आल्यावर मी काहीही बदल न करता नेहेमी करत आलेय. प्रमाण १ कपचे आहे पण मी ४ कपांपर्यंत केलेला आहे हा केक पण प्रत्येकवेळी पल्प वापरूनच. पण घरी काढलेला रस घालून करू शकू पण थोडी साखर जास्त लागेल.
MK-MangoCake-1.jpeg
ही रेसिपी -
१ कप रवा
१ कप मँगो पल्प
१/२ कप साखर (पल्प गोड असेल तर थोडी कमी चालेल)
१/४ कप तेल (शक्यतो वास नसलेले सफोला वगैरे)
१ टीस्पून बेकिंग पावडर
३-४ वेलदोडे सोलून बारिक कुटून
१०-१२ बेदाणे
थोडे बदामाचे काप
MK-MangoCake-2.jpeg
कृती -
ओव्हन ३७५ डिग्री फॅ. प्रीहीट करायला ठेवा

रवा, बेकिंग पावडर, आणि साखर एकत्र करा. त्यात हळूहळू तेल आणि मँगो पल्प घाला आणि नीट एकत्र करा. रवा थोडा फुगल्यासारखा होईल. त्यात आता बेदाणे, बदामाचे काप आणि वेलदोड्याची पूड घाला. नीट मिसळा.

एका लहान (८ बाय ४) बेकिंग ट्रेला तेल लावून घ्या. त्यात मिश्रण ओतू४)बेक करायला ठेवा. साधारण २५ मिनीटात केक तयार होतो. पण एकदा मधोमध तूथपिक किंवा सुरी घालून बघा. ती कोरडी निचाली तसेल तर केक बाहेर काढा. साधरण १०/१५ मिनिटानी केक पॅनमधून काढून गार करा. लहान तुकडे किंवा स्लाईसेस कापून सर्व्ह करा.

टीपा -
किंचीत गरम केलेला केकचा स्लाईस, व्हॅनिला किंवा मलाई आईसक्रीम आणि असेल तर वरून थोडा हापूसचा साखरांबा असे सर्व्ह केले तर अफाट डेसर्ट होते.

नोट - माझ्या मैत्रिणीची रेसिपी तिच्या ब्लॉगवर इथे मिळेल - http://evolvingtastes.blogspot.com/2010/07/easy-mango-cake.html

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle