ट्रायफल पुडिंग

आजची अजून एक रेसिपी म्हणजे ट्रायफल पुडिंग. मूळ रेसिपी इंग्लिश आहे, मी अर्थातच काही बदल करून हे बनवते. तुम्हांला आवडत असल्यास शेरी अथवा डेझर्ट वाईन वापरता येईल, ते व्हर्जनसुद्धा यम्मी लागते :)

साहित्यः-
१. स्पाँज केक - छोटे तुकडे करून.
२. व्हॅनिला पुडिंग- पॅकवरील सूचनांनुसार बनवून घ्या.
३. फ्रेश स्ट्रॉबेरीज बारीक कापून
४. शुगर सिरप - केकवर घालण्यासाठी
५. फ्रेश व्हीप्ड क्रीम
६. गार्निशिंगसाठी पुदिना बारीक चिरून ( हे अर्थातच माझे व्हर्जन Wink )

कृती:-
१. वेळ वाचवण्यासाठी मी स्पॉंजकेक विकत आणला होता, घरी बनवलेला असल्यास तो वापरता येईल.
२. स्ट्रॉबेरीज धुवून, कापून घ्या.
३. पुडिंग बनवून थंड करून घ्या.
४. क्रीम व्हीप करून ठेवा.
५. मी सहसा छोट्या पोर्शनमध्येच सर्व्ह करते. त्यामुळे फोटोत दिसत असलेले पाण्याचे ग्लासेस वापरते. ग्लासमध्ये सर्वप्रथम स्पाँजकेकचे तुकडे घाला. त्यावर थोडे शुगर सिरप घालून ठेवा.
६. त्यावर स्ट्रॉबेरीज घालून त्यावरसुद्धा हवे असल्यास शुगर सिरप घाला, मी घालत नाही.
७. आता वर पुडिंग घाला. हवे असल्यास पुन्हा केकपासून सुरू करून सगळे लेअर्स घाला.
८. सगळ्यात शेवटी व्हीप्ड क्रीम घालून बारीक चिरलेला पुदिना घालून सर्व्ह करा.
९. मी व्हीप्ड क्रीम घातलेले नाही :)
१०. आवडत असल्यास स्पाँजकेकला स्ट्रॉबेरी जॅम लावून वापरता येईल. मला ते व्हर्जन फार गोड वाटते, म्हणून मी तसे करत नाही.
११. थंड करून सर्व्ह करा.

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle