पेपर (शतशब्दकथा)

खूप दिवसांनी तिने काल पेपर उघडून चाळला. हल्ली पेपर तसाच ठेवला जातो, नवरा चाळतो तरी, ती उघडतही नाही.

तिला तिचं बालपण आठवलं, अक्षरओळख नसताना घरी येणारा मटा उत्सुकतेने फक्त उघडून बघणारी, ते आवडीने वाचणारी हा प्रवास. तिने पेपर उघडून बघितल्यावर, मग बाबा ऑफिसमध्ये जाताना घेऊन जायचे. मग वाचता यायला लागल्यावर, पेपरची चातकासारखी वाट बघणे आणि आल्यावर वाचणे. रविवारी तर बाबा लोकसत्ता पण घ्यायचे. मजा यायची वाचायला दोन दोन पेपर.

अनेक लेख अजूनही आठवतात अगदी लेखकांच्या नावासकट.

त्याच पेपरमध्ये खूप वर्षापूर्वी स्वतःचाच आलेला एक छोटासा ललीत लेख बघून झालेला आनंद. पण आता तोच प्रवास संपलाय की तात्पुरता थांबलाय काहीच कळत नाहीये.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle