न्युट्रिशनल'स / Nutritional's हेल्दी फुड प्रोडक्ट्साठी

नमस्कार मैत्रिणींनो,

मी व आपली इथलीच मैत्रिण स्नेहश्री आम्ही मिळुन काही फुड प्रोडक्टचा बिजनेस करु असे ठरवले. अनायसे, मी गव्हाचे सत्व करत होते तेव्हा त्यासाठी त्याचे "न्युट्रिशनल" हे ब्रँड नेम व फेसबुक पेज तयार केले होते. तर त्याच नावाने व त्याच पेजवरुन पुढे काही करु असे ठरले. सध्या आम्ही "रक्षा बंधनानिमित्त गिफ्ट हँपर" लाँच केले आहे.

ह्यात २०० ग्र. रेडी टु मेक केक मिक्स, ८ पेपरकप (मायक्रोवेव्हमधे चालतील असे), केक वर घालण्यासाठी म्हणुन स्प्रिंकलर अशी १ गुडी बॅग देत आहोत. "न्युट्रिशनल" च्या ह्या एका पॅकची किंमत १५० रु. आहे. आम्ही हे गिफ्ट तुम्हि सांगाल तिकडे कुरियर पण करणार :) (कुरियरचे पैसे वेगळे*)

देशाबाहेरच्या किंवा देशातल्यादेखिल ज्या मैत्रिणींना ह्या बरोबर भावासाठी / भाचेमंडळींसाठी राखी व इतर रेडीमेड खाऊ पाठवायचा असेल त्यांना तेही ऑप्शन उपलब्ध करुन दिले आहेत. ज्या ज्या मैत्रिणींच्या नवर्‍याला त्यांच्या इथल्या बहिणीसाठी नुसते केकमिक्स किंवा केकमिक्स व त्याबरोबर खाऊ पाठवायचा आहे त्यांनी तशी ऑर्डर दिली तर तेही कुरियर करता येईल.

फिल यावा व केक कसा आहे हे (चित्रातुन तरी :hahapuva:) कळावे म्हणुन केकचा व गुडी बॅगचा फोटो इथे देत आहे. तर तुम्हा सगळ्यांकडुन पटापट ऑर्डरचा मारा व्हावा व तुमच्या प्रियजनांना मस्त मस्त Nutritional चा यम्मी केक ह्या रक्षा बंधनाला खायला मिळावा ही सदिच्छा :)

बाकी अपडेट मिळवण्यासाठी - gofornutritional@gmail.com ह्यावर मेल किंवा whatsapp @ 98214 71112 OR 98704 15820 करु शकता. देखते रहिये, कुठेही जाऊ नका, आम्ही लवकरच अजुन नविन नविन काहि घेउन येत आहोत, सो ही सगळी माहिती मिळण्यासाठी व अपडेट रहाण्यासाठी www.facebook.com/gofornutritional हे पेज लाईक व फॉलो करा.

हा आम्ही केलेला :drooling: केक - cake2.jpg

व हे गिफ्ट पॅक - gift bag.png

बाकी फोटो खाली कमेंट सेक्शन मधे देत आहे.

(टिप : मी ह्या पानावर जे काही डिटेल्स लिहिणार आहे त्याचा व त्यातल्या व्यवहारांचा मैत्रिण साईट व टिमशी संबंध नाही. केवळ ह्या सुरु केलेल्या नविन उद्योगाची माहिती सर्वांना मिळावी म्हणुन मला इथे लिहायला परवानगी दिली गेली आहे. :)
धन्स बस्कु Hug :hug:)

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle