तटबंदी

अभेद्य अथांग तटबंदी असलेली घरे माणसे आणि समाज कालौघात कशी एकाकी जलदुर्गासारखी होतात,इतिहासाची साक्ष म्हणून फक्त भेटीसाठी ठरविक माणसे येऊन फार फारतर काही क्षण विस्मय,आश्चर्य,आदर व संवाद घडत असतीलही पण दुतर्फा काही मनमोकळं संवादात्मक घडतच नाही,तटबंदी मूळे बाहेरच्या जगाशी काही सम्बन्धच नसल्याने एकतर्फी इतिहासाची उजळणी व पराक्रमाच्या गाथा संगीतल्या जातात,बाहेरच्या जगातले बदलते तंत्रज्ञान,जाणिवा,जगण्यातले संघर्ष,गतिमानता,प्रवास,ताण यांची कशाचीच नोंद मन घेण्यास तयारच नसल्याने,मग फक्त जुजबी विचारपूस व कोरडे बोलणे होते.
जुनी रेकॉर्ड व प्लेअर आणि पिन तिथेच अडकून घरंगळत ,अथवा अडकत येणारे तेच तेच शब्द व ओळी यांमुळे मैफल काही रंगत नाहीच.
मग संवाद,नाविन्याची ओढ आणि रेंगाळण्याने आलेला कंटाळा यातून सहवासाची ओहोटी लागायच्या आत ,परतण्याची वेळ होते,आणि मग आपापल्या किनाऱ्याकडे बोटी वल्हवल्या जातात.
हे असे तटबंदी आयुष्य जगताना सोईस्कर रित्या आपापली बेटे राखत खूप काळ मजेत व स्वतंत्र स्वैर जगलेली माणसे एकटेपणातली गैरसोय जगाला ठणकावून सांगतात पण उपयोग काय ?? स्वतंत्र बेट, तटबंदी तर स्वनिर्मितच असतात ना!!!!
रश्मी भागवत।।

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle