विविध ग्रेव्हींच्या पाककृती

मी सध्या रोज दोन वेळाच जेवते. (ईंटरमिटंट + जगन्नाथ दिक्षित) तसेच जेवणात कडधान्यं रोज घेते. बाकी कशात साखर नाही, गुळ नाही, तेल नाही. (जेमतेम अर्ध्या चमचा तुपात करते स्वयपाक+ पोळ्यांचे तुप), शिवाय भरपूर सॅलड. असे जेवण होत असल्याने कडधान्य/ रस्सा भाजी जरा चमचमीत करते, म्हणजे छान वाटते जेवायला. मी सध्या ह्या एकाच ग्रेव्हीत राजमा, छोले, ब्लॅक बीन्स, ब्लॅक आईड पीज, मसूर इत्यादी केले आहेत. सगळे अफाट सुंदर झाले चवीला. रोज एकच ग्रेव्ही खाऊन कंटाळा येत नाहीये, खरंतर सेम ग्रेव्ही खातीय असे वाटत पण नाही. पण म्हटले नवे प्रकार बघूया.

आधी ही माझी ग्रेव्ही. नवीन काही नसेल. पण खूप झटपट आणि चविष्ट होते म्हणून लाडकी!

साहित्यः
एक छोटा (किंवा अर्धा मोठा) कांदा - त्याची पेस्ट करून. (डायरेक्ट कच्चा कांदा मॅजिक बुलेटात फिरवते)
दोन टोमॅटो - डायरेक्ट मॅजिक बुलेट.
आलंलसूण पेस्ट - पाऊण चमचा.
अर्धा चमचा जिरे.
तिखट, मीठ,
एव्हरेस्ट गरम मसाला. (किंवा कोणताही गरम मसाला)
८ तास भिजवून, इन्स्टंट पॉटला बीन्स्/मल्टीग्रेन मोडवर शिजवलेले कडधान्य

कृती:

१) कढईत तूप गरम करून त्यात जिरे तडतडवून घ्या.
२) मग त्यात आले लसूण पेस्ट घालून परता.
३) मग कांद्याची पेस्ट घालून परता. (कच्चट वास गेला पाहिजे)
४) मग टोमॅटोची पेस्ट घालून परता.
५) झाकण ठेऊन टोमॅटो+ कांदा पेस्ट किंचित सुटी झाली की तिखट्,मीठ, गरम मसाला घालून हलवा.
६) कडधान्य घालून १० मिनिटं उकळा. (ही उकळणं स्टेप महत्वाची. हे केलं नाही राजम्यावेळेस तर पोट दुखले.)
७) कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

हे फोटो: (उगाचच! :ड ) मी रस्सा जरा घट्ट ठेवते. म्हणजे भरपूर खाल्ले जाईल.

rajma.jpg

तुमच्या पेटंट/ लाडक्या ग्रेव्ह्या सांगा. मी वर हेडारमधे अपडेट करीन. डेटाबेस होईल.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle