शिक्षकदिनाच कारण

शिक्षकदिनाच कारण

अक्षर ओळख करून झाली
वाचा आता धडे
रोज रोज म्हणून घेतले
गणितातले पाढे

सुर्याच्या उष्णतेमुळे होते
पाण्याची वाफ
बाष्पीभवन घनिभवन पर्जन्य
घोटून झाले तर सर्व खोड्या माफ

मराठीतल्या कविताना
लावून सुंदर चाल
संदर्भासहित स्पष्टीकरण करत
संपवला सर्व तास

असे शिक्षक घडवतात
नव्या दमाची पिढी
संस्कार करत वाहून घेतात
राहातात साधीसुधी

शिक्षक म्हणून नेहमीच वाटतो
आम्हा तुमचा आदर
भाव पोहचवायचाय आजच
साधून शिक्षकदिनाच कारण

शेफाली जोशी (तृप्ती गोडबोले )

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle