काजूची फुले

fule

गणपतीची तयारी सुरू झाली का? यावेळी प्रसादासाठी थोडं वेगळं काही करून पहाणार का? आमच्याकडे कोकणात आंब्याबरोबर येणारे काजूगर... त्यापासून हाताने वळून बनवलेली ही फुलं! फुलं नाही जमली तर काजू मोदक किंवा वड्या करू शकता.
साहित्यः

काजूगर एक वाटी

साखर अर्धी वाटी

पाणी अर्धी वाटी

खाण्याचे रंग.
fule
कॄती: काजूगरांची पावडर करावी. साखर बुडेल इतके (साधारण अर्ध्या वाटीला थोडे कमी) पाणी घालून पाक करण्यास ठेवावा.साखर विरघळून बुडबुडे दिसू लागले की त्यात काजू पावडर मिसळावी. गुठळी होऊ देऊ नये. तीन-चार मिनिटे शिजू द्यावे. थोडे घट्ट होत आल्यावर मिश्रण खाली उतरून घोटावे.. गोळा तयार झाल्यावर आवडीनुसार खाण्याचे रंग मिसळावे. फुले करायला घेताना आधी छोटी गोळी करावी. त्याला लांबट गोल आकार द्यावा. त्याचा खालचा भाग तसाच ठेवून वरचा भाग चपटा करावा. मधला भाग कळीसारखा दिसेल असा गुंडाळावा. पुढे कडबोळ्यासारखे गुंडाळावे. fule
एका वाटीत २५ फुले होतात.
fule

ही फुले कोणाच्या वाढदिवसाला देता येतील किंवा दिवाळी / भाऊबिजेला भेट देता येतील. व्हिडिओ लिन्क दिलिय सुरुवतिला.

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle