हिन्दी बिग बॉस

हिन्दी बिग बॉस पहातय का कोणी ?
नाही म्हणता म्हणता मी पहायला सुरवात केली आहे .
तसे ३ च एपिसोड्स झालेत पण नमक मिर्च कम है असं वाटलं !
अतरंगी वियर्डो पब्लिक नाहीच्चे यावेळी , नॉर्मल पब्लिक आहे.
हिन्दी बिबॉ याआधी कधी पाहिले नाही पण खूप ऐकून होते क्रेझी पब्लिक बद्दल.. स्वामी ओम, डॉली बिन्द्रा , राखी सावन्त, राहुल महाजन यासारखी क्रेझी कॅरॅक्टर्स मिसिंग आहेत इथे !
जोड्यांमधे नवरा बायको, गरल्फ्रेंड बॉफ्रे नाहीत, ट्रान्स जेंडर, गे कपल्सही नाहीत !
उगीच मित्र मित्र , गुरु शिष्य, गायक फॅन टाईप जबरदस्तीच्या जोड्या केल्या आहेत.
सनी लिऑनी/पायल रहतोगी / वीणा मलिक सारख्या आयटेम गर्ल्सही नाहीत.. सगळं बजेट सलमान खानला पैसे देण्यात संपलं का कलर्स चं ?
यापेक्षा वियर्ड लोक तर मराठी बिबॉ मधे होते.
प्रोफेशन वाइज व्हरायटी भरपूर आहे पण इतके कॉमनर्स का घेतलेत ? :kayaselbara:
बाकी पहिल्या ३ दिवसात सगळ्यांचीच फुटेज घेण्यात चढाओढ चाल्ली आहे, सगळ्याच मेघा धाडे , होमवर्क करून आलेल्या , सगळ्यांनाच स्टँड घ्यायचाय, किचनमधे दिसायचय, आवाज करायचाय, एकदम रट्टा मारके आल्यात , लातुर पॅटर्न म्हणायचे ना पूर्वी , तसे स्टँडर्ड फॉरमॅटचा ओव्हरडोस :drooling:
तरी जे पाहिले त्यात दीपिका , श्रीशान्त , खान सिस्टर्स, बिहारी दीपक , करणवीर , कृति हे प्रॉमिसिंग वाटले.
अनुप जलोटा-जस्लीन सध्या तरी नुसतेच टॉक ऑफ टाउन , गॉसिप कपल वाटतायेत.
ती दीपक ची फॅन उर्वषी अनॉयिंग आहे, व्हिक्टीम कार्ड प्ले करतेय उगीच हम छोटे सहर वाले वगैरे बोलून, फार इरिटेटींग, दीपकही जरा अति डोस आहे .
बघुया किती इंटरेस्टींग होतोय शो पुढे !

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle