कवितेची अर्धी गोष्ट...

मेरे ख़्वाब अंधी गली बन गये
मुझे निंद की रोशनी भेज दे
-बाकर मेहदी
September २०१६ ला हा शेर तिच्या फ़ेसबुक वॉल वर वाचला. एव्हाना वर्ष झालं होतं, मी तिला follow करत होते. एखाद दुसरी प्रतिक्रीया पण नोंदवायचे. ती मोठी लेखिका, उत्तम चित्रकार आहेच शिवाय HIV ग्रस्त बायका मुलांसाठी, वेश्या व्यवसायात अडकलेल्या स्त्रीयांसाठी काम पण करते, याचा मला अगदी वरवर अंदाज़ आला होता. हे समोरच्याचं मोठं असणं जाणवलं की आपसुकच अंतर राखलं जातं! पण तिच्या कविता वाचल्या, तिचं व्यक्त होणं वाचलं, तिच्यातली लेखीका बाजूला सरून आतली लख्ख माणूस चमकली, की हे अंतर न जुमानता तिला मेसेज केलाच जायचा. आधी बरच जुजबी आणि एकतर्फ़ि संभाषण, या वरच्या post ने पार बदलून गेलं. तिच्या जीवाची उलघाल जाणवली, नेमकी मी पण काही तरी कारणाने अस्वस्थ होते तेंव्हा. मुली लहान होत्या, त्यांना झोपवताना शांत गाणी गायचे, तर त्या दिवशीचं गाणं ख़ास तिच्या माझ्या मनातल्या कोलाहलाला शांतवण्यासाठी record केलं आणि पाठवलं मेल ने . अशी सुरू झाली आमची मैत्री. मग तिचा reply आला, कौतुकाची पोस्ट पण आली. प्रत्यक्ष भेट झाली तेंव्हा अगदी घट्ट मैत्रिणी सारख्या गप्पा झाल्या. गाणंही झालच!
ऑगस्ट २०१८ ला तिचा फ़ोन आला पुण्यात शिफ़्ट होतीये. किती काय काय ठरवलं आम्ही . अगदी रोज फोनवर बोलणं, तिच्यासाठी योग्य area शोधणं. तिला हवा तसा flat मिळाला तेंव्हा दिवसभर मी आणि धाकटी लेक गेलो होतो. किचन लावलं त्या दिवशी किती गप्पा झाल्या अवनीच्या लुडबुडीच कौतुक पण झालं. किती गाणी गायला लावली मला तिने! दिशा, तिची लेक आणि दिशाचे मित्र मैत्रिणही होते त्या दिवशी. इतका मजेत सुरू होता आवरा सावर कार्यक्रम. तिला मिळालेले पुरस्कार पाहताना जाणवलं, किती सहज हिने मला तिच्या इतक्या मोठया परिघात सामावून घेतलय! महिन्यातली एक तारीख़ ठरवून मी दिवसभर घरी येऊन खूप गाणी गायची अशी गळ घातली होती तिने. काही कवितांचे video करायचे होते आम्हाला. एक audio blog सुरू करायचा होता, आणि खूप बोलायचं पण होतंच की.
पण सगळं अर्ध्यातच टाकून गेली ती. गाणी मी गात राहीनच , पण ते बोलायचं राहिलं त्याचं काय करु मी. मरण असं कधी पण अनाहुत गळाभेट देतं ही पुन्हा जळजळीत जाणीव झालीये ना , ती कशी हाताळायची? अवनी , अनुष्काला जोयाना , कुहू सगळ्यांची भेट घालून देणार होती ती . ते आता एकटीने करणं आलं.

दिशा Canadaला जायची होती , पण visa अडकल्याने तिचं जाणं लांबलं होतं. ही काय खेळी होती दैवाची ? कोणते संकेत होते? गेलं वर्षभर ताई कायम मृत्यु बद्दल काहीना काही लिहायची. कधी कविता कधी काही पोस्ट. सहज दिलेल्या उत्तरातही पैलतीर दिसायचा. काय दाटलं असेल तिच्या मनात ही चाहुल लागल्यावर?
मला वाटायचं मी खूप कोडगी आहे या बाबतीत. खूप जवळची माणसं जाणं अगदी शांतपणे पचवलय मी. पण काल अगदी बांध फुटला. काय ऋणानुबंध होते कोण जाणे. आठवणींच्या पेटाऱ्यात या झगमगत्या पाचू माणकांची भर तेवढी पडली!
कविता ताई, तू कायम चमकत राहशील तिथे आणि तुझ्या कविता माझ्या मनात पिंगा घालतच राहतील.
तुला अगदी पहिलं पाठवलेलं गाणं आठवतय ना,
एक ख़त्म हो तो दूसरी
रात आ जाती है
होंठों पे फिर भूली हुई
बात आ जाती है
दो नैनों की है ये कहानी
हो थोड़ा सा बादल थोड़ा सा पानी
और एक कहानी
दो नैना और एक कहानी!

एक नवी गोष्ट वाट पाहतेय तुझी ! :dhakdhak:

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle