लाल भोपळ्याचा हलवा

halva.jpg लाल भोपळ्याचा हलवा
साहित्य: अर्धा की भोपळा, 200 ग्रॅम खवा, पाऊण वाटी साखर, वेलची पावडर अर्धा चमचा, केशर काड्या, बदाम काप, बेदाणे, तूप तीन चमचे.
कृती: भोपळा किसून घ्या. कढईत तूप तापत ठेवा. त्यात भोपळ्याचा कीस परता. पाच मिनिटं परतून झाल्यावर साखर मिक्स करा. खवा घाला. वेलची पावडर, बेदाणे घाला. दहा मिनिटं मंद गॅसवर परतत रहा. तूप सुटू लागलं की गॅस बंद करा. बदाम कापांनी सजवा. भोपळ्याचा हलवा उपासाला चालतो.
आजच्या रंगाचा पण झाला प्रसाद! भोपळ्याचा वास मात्र कळतो हलव्यात... बघा करून आवडतोय का

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle