गुणाची बाई माझी

आपल्याला घरकामात मदत लागते. ती करते कोण तर कामवाली बाई. ह्यांचे किती तरी प्रकार आहेत. मला काही अनुभवायला आले ते लिहीत आहे. प्रतिसादात भर घाला.

१) " मला हे हवे अन ते हवे. : : ही मदत करते पण पगारा सोबत तिला इतर काही बरेच हवे असते. घरात मदत. दागिने गहाण आहेत ते सोडवायला पैसे, गरम चहा, मुलांच्या शिक्षणाला, लग्नात आर्थिक मदत, घर बांधायला मदत सारखे जास्त पैसे मागत राहते. समटाइम्स जस्टिफाइड कधीकधी वाट्ते त्या पेक्षा तिची आपल्याला कामात मदत नको.

२) किती भोचक पणा?! : काम नीट करणार पण सारखा तोंडाचा पट् टा चालू. घरचे दारचे गॉसिप, आपल्या वर मुलांवर कमेंट पास करणे, नो सोशल ग्रेसेस. प्रत्येक बाबतीत चाणाक्षपणे ऐकून मत देणार. इतर घरातील बायकां बद्दल माहिती देणार, आपल्याला नको असताना. आपल्या पर्सनल स्पेस बद्दल काहीही रिगार्ड नाही.

३) अ‍ॅबसेंट मेडः जेव्हा कामाला येइल तेव्हा नीट काम करणार पण इतक्या सुट्ट्या घेणार, एक तर आजारी नाहीतर गावाला जाणार, नाहीतर घरचा काहीतरी प्रॉब्लेम. आपण काम करून टाकल्यावर उगवणार.

४)निगोशिएट रः कायम काम निगोशिएट करत राह्णार. इतके पैसे दिलेतर हे करीन नाहीतर ते करीन. धुणे वाळत घालणार नाही. हे नाही अन ते हो. इतक्या अटी की काय करशील ते कर माझे आई... असे ह्ताश पणे मनात येते.

५) गुड लुकिन्ग अँड आय नो इट टाइपः ही पण काम नीट करते पण दिसायला छान व तरूण असल्याने एकदम तोर्‍यात असते. ओढणी नीट घ्या पदर खोचून काम करा वगैरे सांगायची चोरी.

६) वयस्कर : काम होत नाही पण घरी नुसते बसवत नाही म्हणून कामाला येते. हळू हळू करते व सर्व ऐकून घेते. ( कदाचित ऐकू येतच नाही. ) आजारी पडते किंवा काही मेजर तक्रारी असतात. पण दुर्लक्ष करते. गावी पूजा वगिअरे घालते. सुनेशी पटत नाही.

७) अन्न पूर्णा: चांगल्या पैकी स्वयंपाक करते. पोळ्या आपल्या पेक्षा छान पातळ करते. पुरण पोळी पण सुरेख करते. कसबी कलाकार असल्याने ऑलवेज इन डिमांड. घरी पार्टी असल्यास हिच्या शिवाय करणे फार जड जाईल. ही आली नाही तर किचन चे तोंड रेग्युलरली बघावे लागेल अशी
छुपी भीती आपल्या मनात असते.

अशी ही आपली काम वाली/ मोलकरीण / मजुरीण/ हेल्प/ हिच्याशी आपले नाते तुझेमाझे जमेना
पण तुझ्यावाचून करमेना असे असते. जगातल्या सर्व मेड्स ऑफ ऑनरना माझ्या तर्फे फ्रेंडली हग. इफ यू वेर नॉट इन माय लाइफ इट वुड हॅव बीन इनकंप्लीट. अँड माय होम अ बिट डर्टी.

डिस्क्लेमरः विनोदी लेख आहे. हलके घ्या.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle