चाहुल

खुपचं दिवसांनी इकडे येतीये.... खरं तर वेळच मिळत नव्हता. वेळ काढला की मिळतो.. पण आधी जॉब मध्ये खूप वेळ जायचा. आणि नंतर सेल मध्ये.. गडबडीत दिवस संपून जायचा..स्वतःसाठी सुधा वेळ मिळत नव्हता.... पण आज खूप दिवसांनी कविता सुचली.. मग काय इकडे सांगितल्याशिवाय राहवेना... आता आईकडे आहे ना..त्यामुळे वेळच वेळा आहे... आराम आहे.. आता येत जाईन इकडे regular....

या कवितेला मला खास अस काही शीर्षक सुचलं नाहीये..तर तुम्हीच सुचवा काहीतर.. मी आपलं तातपुरत नाव दिलं..

चाहूल
लागली नाजूक पावलांची चाहूल
आणि आपल्या सहजीवनी सुंदर आला बहर

साथ अापुली जशी आहे एकमेकांना
राहुदे तशीच ही मनोकामना

लवकरच येईल हातात राजस गुलाब किंवा गोड चाफेकळी
स्पर्शाने जिच्या मोहरुन निघेल तन मन आणि कांती

मिळून घेऊ जबाबदारी नवीन पाहुण्याची
आगमनाने ज्याच्या मोहरुन निघेल प्रीत आपल्या सहजीवनाची

कविता: 

वर
0 users have voted.