दिवाळी स्पेशल: बुरा साखर: बुरा साखर बेसनलाडू:

बुरा साखर: बुरा साखर बेसनलाडू:

कोणीतरी भेट आणलेले बेसन लाडू खाल्ल्यावर लक्षात आलं यात काहीतरी वेगळं घातलंय. पिठीसाखर न वापरता बुरा साखर म्हणून रवाळ साखर मिळते बाजारात, ती वापरून लाडू केलेत हे कळल्यावर त्याचा आंतरजालावर शोध घेतला. तेव्हा ही रेसिपी मिळाली.

साहित्य: तीन वाट्या साखर, एक वाटी पाणी, दोन चमचे तूप

कृती:

एका कढईत साखर आणि पाणी एकत्र करून मोठया आचेवर ढवळत राहावे. साखर विरघळली की त्यात तूप घालावे. एक वाटीत अर्धी वाटी पाणी घ्यावे. त्यात पाकाचा थेंब टाकून बघावा. गोळी झाली की गॅस बंद करून कढई खाली उतरावी आणि सतत ढवळत राहावे. हळूहळू पाक घट्ट होत जातो आणि त्याची रवाळ साखर तयार होते. गार झाली की डब्यात भरावी. ही साखर वापरल्याने लाडू खाताना चिकटत नाहीत.
sakhar.jpg
बुरा साखर बेसनलाडू:
साहित्य: अर्धा की चणाडाळ, 400 ग्रॅम बुरा साखर, 250 ग्रॅम तूप, एक चमचा वेलची पावडर, काजूगर/बदाम काप, बेदाणे, पाव वाटी दूध.
कृती:

चणाडाळ कोरडी खमंग भाजून घ्यावी. रवाळ दळून आणावी. कढईत 250 ग्रॅम तूप घ्यावे. त्यात भाजलेल्या डाळीचे पीठ मंद गॅसवर तांबूस रंगावर भाजावे. डाळ भाजल्याने पीठ कमी भाजावे लागते. आपल्याला हवा तसा रंग आला की त्यात पाव वाटी दूध शिंपडावे. गॅस बंद करावा. दुधामुळे पीठ छान फुलते. भाजलेले पीठ गार झाले की त्यात तयार बुरा साखर, वेलची पावडर, काजू बदाम काप घालावे. गरज असेल तर तूप किंवा साखर वाढवावी. बेदाणे लावून लाडू वळावे. बुरा साखरेचे लाडू छान रवाळ लागतात.ladu.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle