Uptown Girls

आज आठ वर्षांच्या चिमुरड्या रे(ray) चा ballet performance आहे. ती तिच्या अत्यंत लाडक्या व्यक्तीने- माॅलीने स्वतः design करुन शिवलेला टूटू ड्रेस घालून पडद्या आड सज्ज आहे खरी पण मनात तिच्या येण्या न येण्याबद्दल धास्तावलीये. (माॅली म्हणजे आपल्या रे ची बावीस वर्षीय ‘X- Nanny’.)
पडदा उघडतो सुरुवातीचे काही ballet performances होऊनही जातात. रे आता त्या ख़ास सादरिकरणासाठी पूर्ण सज्ज झालीये. इतक्यात माॅली कशीतरी धावपळ करत ,पडत धडपडत धांदरटपणे स्वतःच्या जागी बसते. रेच्या नावाची घोषणा होते आणि प्रेक्षकांच्या लांब चेहऱ्याच्या परिट घडी गर्दीतनं माॅली उभी राहुन जोरजोरात ओरडत टाळ्या पिटते! रे तिच्या हुकमी शांत स्थीर चेहऱ्याने अभिवादन करते. मग त्या ख़ास बॅले साठी ख़ास गायकाची announcement होते , स्टेज वर नीलची entry होते आणि अचानक परिटघडी गर्दीतनं झाडून सगळ्या पोरी उभ्या राहतात नील नील ओरडतात काय किंचाळतात काय! माॅली अवाक् होऊन पाहते. हा आपला नील अचानक इतका भारी rockstar कधी झाला! तिथेच ‘रे’चे डोळे चमकतात! ‘आगे आगे देखो होता है क्या’.
नील बोलायला सुरवात करतो प्रेक्षागृह पुन्हा शांत होतं. माॅली अजुनही अचंब्याने बघतेय तोवर नील ती पाठीमागे लटकवलेली स्पेशल गिटार हातात घेतो, “ही टाॅमी गनची सर्वात लाडकी गिटार होती , आणि मी तुमच्यासमोर त्यांनी त्यांच्या सर्वात प्रिय व्यक्तीसाठी लिहीलेलं गाणं सादर करतोत. हे आहे ‘माॅली गन’ साठी”
आणि मग स्टेजवर गोष्ट अवतरु लागते, माॅली आणि तिचे हयात नसलेले rock legend बाबा Tommy Gunn यांची!

Daddy's little girl paints the world with her magic wand
Daddy's little child breathes new life to the morning time for me
Though we're apart, her thoughts follow me
When I come home,
Molly smiles with the dawn
Molly smiles, and she radiates the glow around her halo
When she plays, Molly smiles
On a summer day, Molly smiles
A new day, Molly smiles

एक एक मुलगी जस जशी एक एक गिटार स्टेज वर घेऊन येते, रे स्वतःचे बॅलेचे पारंपारीक हटवादी तत्व सोडून चक्क freestyle नाचते , माॅली अशीच तर आहे ना ‘freestyle’! मग तिच्या गोष्टीत ती अशीच दिसायला हवी.

Daddy's little girl ties a ribbon around my heart
Daddy's little child waves goodbye to the ocean tide that sweeps me
Though we're apart, she's a part of me
Molly smiles with the dawn
Molly smiles and she radiates the glow around her halo
When she plays, Molly smiles
On a summer day, Molly smiles
A new day, Molly smiles

बापाने शब्दाशब्दात आणि chords अन chords मधे ओतलेली लेकीची माया.
माॅलीचा चेहरा रेच्या कौतुकाने, बापाच्या विरहाने, नीलच्या धक्क्याने, लहानपणच्या आठवणीने असा माया, दुःख, अचंबा, आनंद आणि कसल्या कसल्या भावनांने अगदी न्हाऊन निघालाय. चांदण्याचं इंद्रधनुष्य जसं.

When I come home, Molly smiles with the dawn
Molly smiles and she radiates the glow around her halo
When she plays, Molly smiles
On a summer day, Molly smiles
A new day, Molly smiles
When the days have gone grey,
Nothing's wrong when Molly smiles!

हे गाणं एका मोठ्या concertला सादर करुन येताना अपघातात हिने आई बाप दोघे गमावलेत. त्या दिवसा पासून तिचं ख़ास गाणं, तिची गोष्ट असुनही ही दूर पळतेय. पण आज सारा धीर गोळा केलाय तिने लहानपणात घाबरुन लपुन बसलेल्या स्वतःला भेटायचा.
रे मुळेच शक्य झालय तिला हे करणं.
गाणं संपलय,सगळे उभे राहुन टाळ्यांचा कडकडाट करतायेत , माॅलीच्या डोळ्यांना धारा लागल्यात अन मग रे चा voice over ऐकू येतो,

“Every story has an end but in mine every ending is just a new beginning!”

का केलं रेने हे माॅली साठी? नील आणि माॅलीची काय स्टोरी होती? रेची पण गोष्ट असेलच ना मग?
आहेच! आणि पण खूप लोकं आहेत रेचे आई- बाबा, एक फिरत्या कपबशीचं amusement park, नीलच jacket, Egyptian cotton, माॅलीची मित्रमंडळी, पाळलेलं डुक्कर आणि Tommy Gunnचं गिटार कलेक्शन! नक्की बघा, ‘Uptown Girls’ एखादी गोष्ट तुमची पण असेल कदाचीत!

गाण्याची लिंकः Molly Smiles

Movie: Uptown Girls
Initial release: 15 August 2003
Director: Boaz Yakin
Cast:
Brittany Murphy as Molly Gunn
Dakota Fanning as Laraine "Ray" Schleine
Jesse Spencer as Neal Fox

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle