लॉस एंजिलीसचा ट्रॅफीक !!

एल.ए.चा ट्रॅफीक! Vaitag

trafficjam

काय शब्दच सुचेना झालेत मला तर आजकाल. इतका भयाण ट्रॅफीक मी खरंच आख्ख्या आयुष्यात पाहीला नाही. हो, अगदी पुण्यातला अलिकडचा वाढलेला ट्रॅफीकही फिक्का आहे अगदी ह्याच्यासमोर. अर्धा-एक तास कधी नुस्तंच स्टिअरिंग व्हील हातात पकडून बसून राहायचे तर कधी आपलं ५ माईल च्या स्पीडने चालवत, व प्रत्येक मिनिटात किमान १७ वेळा तरी ब्रेक दाबत गाडी चालवायची. चालवायची हे क्रियापद फारच फास्ट आहे. रेटायची, ओढायची वगैरे ठिके. अर्थात फ्रीवे नसेल तर दर काही फुटांवर येणारे व जीव जाईस्तोवर लालच राहणरे सिग्नलचे दिवे येतात. त्यातून रस्ते काही सबर्बसारखे प्रशस्त नाहीत.. सगळा गिचमिडकाला.. इतकं फ्रस्ट्रेटिंग आहे ना इथे गाडी चालवणे. सिरिअसली.

दोनेक वर्षापूर्वी मला एका कामानिमित्त एके ठिकाणी भल्या सकाळी ८ वाजता पोचायचे असायचे. कित्तीही सकाळी उठले तरीही मी आपली १० ते १५ मिनिटं उशीराच उगवणार. समजतच नाही मला असे होते तरी कसे? बरं अंतर किती असेल ते? ६ नाहीतर ७ माईल्स! ६-७ माईल्सना साधारण ३० माईल्स ताशी वेगाने गेल्यास किती वेळ लागावा? :thinking: २०-२५ मिनिटं? चला अजुन एक्स्ट्राची १५ मिनिटं अ‍ॅड करूया. पाऊण तासात पोचू म्हणजे आपण? शक्यच नाही! सकाळी ७ वाजता जरी घरातून निघाले तरीही ८.१५ ला इप्सित स्थळी जायची किमया मी (किंवा एलएच्या ट्रॅफीकने) केली आहे. :rollingeyes:

पण तरी नशिब मी आमच्या घराच्या जरा साउथला जायचे तेव्हा. घरापासून नॉर्थला जायचे असेल तर देवावरच भरोसा. कारण घराच्या जवळच वाटेत लागतं जगप्रसिद्ध हॉलिवूड बुलेवार्ड. तिथली गर्दी कधी कमी झालेली मी ह्या ४ वर्षात पाहीली नाही. काय त्या मेल्या चांदण्यांच्या रस्त्याचे ( वॉक ऑफ फेम ) किंवा आकाशाकडे दोन पाय व सोंड करून बसलेल्या खांबावरच्या ४ हत्तींचे (हॉलिवूड& हायलँड) किंवा जराश्या भितीदायकच दिसणार्या चायनिज थिएटरचे कौतुक? हा आता ऑस्करचे सोहळे होतात ते कोडॅक/डॉल्बी थिएटर आहे म्हणा तिथे. आणि विविध कॅरॅक्टरसे कॉश्चुम्स घालून किंवा नाचगाणी करणारे कलाकार असतात बघण्यासारखे. कधी चायनिज्/डॉल्बी थिएटरमध्ये प्रिमिअर्स होतात, तेव्हा तर विचारू नका. अतोनात गर्दी हा वाक्प्रचार मलूल वाटतो अगदी.. इतकी तुडूंब गर्दी होते. मला दिसला होता जेम्स फ्रँको! :fadfad: स्पायडरमॅन चित्रपटातला पीटर पार्कर अगदीच आवडायचा नाही पण त्याचा मित्र मात्र आवडायचा. असो.. मागे एकदा काय म्हणे जस्टिन टिंबरलेक अचानक त्या चौकात येऊन नाचगाणी करून जाणार होता. रस्ते बंद. गर्दी गुणीले २. चिडचिड गुणीले १०... ओह आणि मिस्टर प्रेसिडंट - ओबामाला विसरून कसे चालेल? गेल्या २-३ वर्षात ओबामा किमान ५-६ वेळा आला असेल. काय असतील त्यांचे फंडरेझर्स बेव्हर्ली हिल्स एरियात.. पण आमचं काय? किती रस्ते बंद होतात.. गर्दी गुणीले ५.. चिडचिड गुणीले ५०!! Vaitag
मध्यंतरी असाच एकदा ओबामा आला होता.. तर तेव्हा माझा नवरा घरीच येऊ शकत नव्हता. कारण अपार्टमेंट कॉम्प्लेक्सपाशी जाणारे सगळे मेन रस्ते बंद.. विलशायर बंद, थर्ड बंद, सिक्स्थ बंद.. अक्षरशः मी घरात बसून कोणते रस्ते बंद आहे ते एकीकडे उघडून मॅपवरून चित्र काढून सांगितले आता इकडे वळ, तिकडे जा. व्हेरी फनी!! Worried :rollingeyes:

एनीवे.. एकदाचा हॉलीवूड बुलेवार्ड पार पाडला.. तरीही गर्दी असतेच. आता काय बाबा? ओह येस. हॉलिवूड बोल! आय स्वेअर, मला त्या हॉलिवूड बोलबद्दल ममत्व वाटायचे हे आता मलाच खरे वाटत नाही. आम्ही कॅमरिओहून एलएला मूव्ह होण्याच्या अगदी एकच वीकेंड अगोदर तिथे एआर रहमान येऊन गेला होता. अगदी टोचलं होतं मनाला. असं कसं मिस झाले. पण नंतर ४ वर्षात तिकडे एकदाही आला नाही. आत्ता जूनमध्ये आला तो आला नोकिआ थिएटरला. डाउनटाऊनला कोण जाणार त्याला पाहायला. असो..
हॉलिवूड बोलला होणार्या कॉन्सर्ट्समुळे होणारा ट्रॅफीक ही कटकट अनमेझरेबल-अनडिनायेबली-पेन-इन-द-नेक-फ्रस्ट्रेटिंग-*ट आहे.. यु जस्ट कॅनॉट डू एनिथिंग. कधीकधी ती गर्दी , तो ट्रॅफीक इतका पूराच्या पाण्यासारखा फुगतो की २-३ माईल्सवर असलेल्या माझ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या समोरपर्यंत गाड्या आपल्या थांबलेल्या. माझ्या थर्ड स्ट्रीटवरच्या घरावरून हायलँड अ‍ॅव्हेन्यूला जायला म्हटले तर ५ मिनिटं लागतात. त्या ५ मिनिटाची १५ होतात. व हायलँडवरचा मुक्काम वाढतो अजुन २० म्निनिटांनी. म्हणजे हायलँडवरून १०१ पकडेस्तोवर ऑल्रेडी पाऊण तासाच्या वर वेळ उलटून गेलेला असतो. त्याच्या पुढे अर्थातच 'दी १०१' ची गर्दी!

सदर्न कॅलिफॉर्नियाच्या लोकांशी आईस ब्रेक करणारे संभाषण कोणते? तर १०१, आय-५ किंवा ४०५. हे दोन,तीन आकडे उच्चारा समोरचा पोपटासारखा बडबड करू लागेल. सगळे नुसते धुमसत असता ह्या दोघा-तिघांच्या नावाने. पण 'धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय' अशीच गत. फ्रीवे घ्यायचा नाही म्हटलं तर न संपणारी सिग्नल्सची रांग पार पाडायचे दिव्य असते. फ्रीवे घेतला तर काय आहेच गर्दी. इथे मिळणार्या 'नेकेड' नावाच्या प्रोटीन ड्रिंकची अ‍ॅड्/बिलबोर्ड यायचे मध्यंतरी, अगदी बरोब्बर फ्रीवेच्या आधी..

naked

सगळ्यात वाईट म्हणजे१०१ घेतला आहे, पण तसा लगेचच तुमचा एक्झिट येणार आहे. ओह नो, गॉड हेल्प यु. जी काय तगमग तगमग होते उजवीकडच्या लेन्सना जाण्याची. त्या महाभयंकर ट्रॅफीकमधून, कधी गाड्या थांबलेल्याच असतील तर काहीच करता येत नाही. पण एकदा जॅम सुटला अन गाड्या सुसाट पळू लागल्या की स्वतःचा व गाडीचा जीव वाचवत ४-५ लेन्सचा बदल करत जाणे ह्यामध्ये हमखास तुमचा एक्झिट मिस होतो. मग आहेच परत लांबचा रस्ता वगैरे वगैरे.

फ्रीवेवर किती व का वेळ लागतो हे मला आजवर समजलेलं नाहीये. उगीच आपलं व्हील घेऊन ताटकळत बसायचे. पाठदुखी करून घ्यायची. पोटात (अन डोक्यात) आगीचा डोंब उसळून घ्यायचा. मागच्या कारसीटवर बसलेल्यांचा आयपॅड संपवायचा.. त्यांचे रड्णं ऐकत , ट्रॅफीकशी झुंज देत, एखाद्या रॅश ड्रायव्हरपासून बचाव करत आपलं घरी यायचं. अक्षरशः सांगते घरी आल्यावर लढाई करून आल्यासारखे वाटते! :rollingeyes: Vaitag :raag: Sleepy

पण एक आहे. बाहेरच्यांचे काहीही मत असो.. माझे तर ठाम मत आहे, ह्या सर्वामुळेच लॉस एंजिलीसचे ड्रायव्हर्स( बरं.. बहुतांश ड्रायव्हर्स) एंजल्स असतात अगदी!! :) ते तुम्हाला गरज असेल तेव्हा डावीकडे वळू देतात, लेन चेंज करायला मदत करतात, समोरच्याला पॅरलल पार्कींग अजिबात जमत नसताना त्याची ती कसरत पाहात शांतपणे वाट पाहतात, जाऊ देतात.. अगदी एंजल्स! उगीच का आमच्या शहराचे नाव, लॉस एंजीलीस आहे, जिथे एंजल्स राहतात ते शहर. :)

वेल, आय लव्ह माय सिटी. नो डाउट अबाउट इट. इतकं सुंदर, प्रेक्षणीय, उत्तम हवेचे ठिकाण आहे हे. उत्तम वेदरमुळे कधीही बाहेर पडून हवा तो प्रोग्रॅम आखण्याची मुभा, प्रेक्षणिय/थीम पार्क्स/हाईक्स/मॉल्स कशाचीच कमी नाही. पण एक गोष्ट मी अ‍ॅब्सोल्युटली बदलून टाकीन तो म्हणजे ट्रॅफीक.

किंवा कोण जाणे. मी कार चालवायला शिकलेच मुळी ह्या एलएच्या रस्त्यांवर. मला कुठूनही आले तरी हॉलिवूड्/हायलँडची गर्दी लागत नाही तोपर्यंत 'घरी' आल्यासारखे वाटत नाही हे ही तितकेच खरे! :)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle