खरवसाची( चिकाची) वडी:

साहित्यःIMG_20161130_121756_610minalms_2.jpg
पहिल्या दिवसाचा चीक दोन वाट्या, साखर दोन वाट्या, वेलची पावडर, दूध दोन वाट्या, केशर, बदामाचे काप.
कृती:
पहिल्या दिवसाचा चीक नुसताच शिट्टी न लावता १५ मिनिटे कुकरला वाफवून घ्यावा. गार झाला की भांड्यातून काढून किसावा.IMG_20161130_111453_901minalms_2.jpgमी अर्धा चीक मिक्सरला फिरवून घेतला. जेवढा चीक असेल तेवढी साखर, चीक आणि दूध कढईत एकत्र करावे.
मध्यम आचेवर मिश्रण ढवळत रहावे. IMG_20161130_121430_263minalms_1.jpgएकजीव झाले की वेलची पावडर आणि केशर मिसळावे.
ताटाला तूप लावावे. मिश्रणाचा गोळा होत आला की ताटात थापावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. हवे असल्यास बदामाचे काप सजावटीसाठी लावावे.
गोडीला कमी हवे असेल तर साखरेचे प्रमाण कमी घ्यावे.
पूर्वी मुंबईकर मंडळींना लगेच चिकाचे दूध पाठवता येत नाही, म्हणून अशा वड्या करून खरवस पोहोचवला जायचा.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle