नट्टी पालक पुलाव

लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
२ वाट्या बासमती तांदूळ अर्धा तास भिजून नंतर त्याचा मोकळा शिजवून घेतलेला भात, एक जुडी पालकाची ब्लांचकरून केलेली प्युरी, बटरच १०० ग्रॅम, एक चमचा तेल, वाफवलेले मक्याचे दाणे,एक मोठा कांदा उभा चिरलेला,खडा ( सबंध) मसाला ह्यात पाच-लवंगा, काळी मिरी, हि.वेलदोडा, दोन ब. विलायची, एक तेज पत्ता व गोड लाकुड उर्फ मिठी लकडी उर्फ दालचिनी, चवी पुरतं मीठ, अर्धा कप क्रीम , मी एक कप फुल क्रीम मिल्क वापरलं तुम्ही चीजही घालू शकता. नट्टी आहे तर आपल्या आवडीनुसार दोन मुठी सुकामेवा आपल्या आवडीनुसार (बदाम, काजू, अक्रेड, पिस्ते, बेदाणे )आणि शास्त्रापुरती हळद
क्रमवार पाककृती:
एका मोठ्या पातेल्यात तेल टाकून सुकामेवा तळून काढून घ्या हे करण्यासाठी अर्थातच गॅसवर पातेल/कढई ठेवून पेटवावा लागणार आहे. गॅस बंद नकरताच त्यातच बटर टाकल्यावर खडा मसाला व कांदा टाका. कांदा पारदर्शक झाला की पालक प्युरी टाका. दूध/क्रीम टाकून आटवून घ्या. त्यात आता भात टाका. चवीनुसार मीठ टाका काळजी घेत कारण बटरमध्येही मीठ आहे . चीज वापरणार असाल तर आता टाका. वाफवलेले मक्याचे दाणे व तळलेले नट्स टाका. चांगला परतून एक दणदणीत वाफ काढा. चव घेऊन पहा. बिघडायचा फार चान्स नाही पण मीठाचं तेवढं बघा. मी शक्यतो कमीच घालते गरज पडली तर वरुन घालता येतं. गॅस बंद करा. गरम गरम खायला तयार!
वाढणी/प्रमाण:
१० जणींच्या पार्टीला इतर पदार्थांबरोबर पुरला होता.
अधिक टिपा:
मिरची हि. /ला. वापरली नाही. हा सौम्य चवीचा भात आहे. घालायचीच असेल तर तुम्ही हिमि. च वापरा रंग बदलणार नाही.
शास्त्रापुरती हळद म्हणजे किती ? आई, आजी, काकी, मामींना विचारावी.

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle