वैद्यकशास्त्रातील २०१८ चा नोबेल पुरस्कार

लेखिका - धारा

nobel_2018_medicine.jpg

(चित्र सौजन्य : https://www.sciencenews.org)

यंदाचा शरीरविज्ञान व वैद्यकक्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार कर्करोगासारख्या दुर्धर आजारावरील उपचारांच्या क्रांतिकारी संशोधनाबद्दल अमेरिकेचे वैज्ञानिक जेम्स पी. अ‍ॅलिसन आणि जपानचे वैज्ञानिक तासुकू होंजो यांना विभागून देण्यात आला आहे.

थोडक्यात :

  • कॅन्सरमुळे रूग्णाची प्रतिकारशक्ती अत्यंत कमकुवत होते. प्रतिकार करणार्‍या पेशी कमी होत जातात आणि रूग्ण मृत्यूच्या दाढेत ढकलला जातो. यामुळे कॅन्सरशी लढण्यासाठी पुरेशी प्रतिकारशक्ती रूग्णाला मिळावी, यासाठी अनेक दिवस प्रयत्न सुरू होते.
  • यावर उपाय म्हणून अ‍ॅलिसन आणि होंजो या शास्त्रज्ञांनी अशी थेरपी शोधून काढली ज्यामुळे रूग्णाची कॅन्सरला प्रतिकार करण्याची शक्ती वाढवता येऊ शकेल आणि शरिरातील पेशी कॅन्सरपासून सुरक्षित राहू शकतील.
  • T cells या आपल्या शरीरावर हल्ला करणार्‍यांना शोधणारी पेशी आहे. काही प्रोटिन्स या T cellsना शरीरातील इतर काही cells वर हल्ला करण्यापासून रोखतात, म्हणजे हे प्रोटिन्स आपल्या रोगप्रतिकारक प्रणाली (immune system) मध्ये 'ब्रेक' किंवा 'off switch' म्हणून काम करतात.
  • डॉ. अ‍ॅलिसन यांनी अशाच ब्रेक म्हणून काम करणार्‍या प्रोटीन CTLA-4 चा अभ्यास केला. त्यांना ब्रेक सोडण्याची क्षमता समजली आणि त्यामुळे ट्यूमरवर हल्ला करण्यासाठी आपल्या रोगप्रतिकारक पेशी काय करतात, ते ही समजले. त्यानंतर त्यांनी रुग्णांवर उपचार करण्यासाठी या संकल्पनेला नविन दृष्टिकोनाने विकसित केले.
  • त्याच दरम्यान, डॉ. होंजो यांनी रोगप्रतिकारक पेशीमधले PD-1 हे एक प्रोटीन शोधले आणि त्याचे कार्य समजून घेताना त्यांच्या लक्षात आले की हे प्रोटीनसुद्धा ब्रेक म्हणून काम करते, पण वेगळ्या पद्धतीने. त्यांच्या या शोधावर आधारित कॅन्सरवरचे उपचार अत्यंत प्रभावी ठरले.
  • कॅन्सरवरील उपचारामध्ये आपल्या रोगप्रतिकारक व्यवस्थेला ब्रेक लावण्यापासून परावृत्त करणार्‍या भिन्न प्रणाली शोधून काढल्या. पण या दोन्ही शास्त्रज्ञांच्या प्राथमिक शोधांचे कॅन्सरविरुद्धच्या लढ्यात अतिशय महत्वपूर्ण स्थान आहे.
  • आशियाचे नोबेल समजला जाणारा टँग पुरस्कार २०१४ मध्ये होंजो यांना मिळाला होता.
  • वैद्यकशास्त्राचे हे १०९ वे नोबेल आहे.
  • James P. Allison यांची मुलाखत
  • Tasuku Honjo यांची मुलाखत

अधिक विस्तारीत स्वरूपात :

immune therapy साठी नवी प्रणाली

१९९० च्या दशकात डॉ, अ‍ॅलिसन यांनी the T-cell protein CTLA-4 चा अभ्यास केला. त्यांनी CTLA-4 चे काम T cells वर ब्रेक म्हणून करणे आहे, हे शोधले. याचा वापर autoimmune disease च्या उपचारावर इतर संशोधकांनी केला. पण अ‍ॅलिसन यांनी CTLA-4ला जोडून घेणारी आणि तिचे कार्य रोखणारी एक antibody आधीच शोधली होती. आता त्यांना CTLA-4 ची नाकाबंदी T-cell ब्रेक तोडू शकते का, हे पहायचे होते आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीप्रणाली कॅन्सरच्या cellsवर हल्ला करू शकणार होती. १९९४ मध्ये त्यांनी हा प्रयोग पुन्हा पुन्हा करून पाहिला. त्याचे परिणाम विलक्षण होते. या उपचारामुळे कॅन्सरग्रस्त उंदरांचा कॅन्सर गेला होता आणि त्यांच्या T-cell मधला ब्रेक निघून ट्युमरला विरोध करू शकत होता. औषध कंपन्यांकडून फारसा प्रतिसाद नसतानाही अ‍ॅलिसन यांनी तीच प्रक्रिया माणसांवर करण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू ठेवले. इतर ग्रूप्स मधूनही आश्वासक परिणाम दिसू लागले आणि २०१० मध्ये एका प्रकारच्या त्वचेच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्येही आश्चर्यकारक परिणाम दिसून आलेत. काही रुग्णांमध्ये तर उरलेल्या कॅन्सरची लक्षणंही नाहीशी झाली. इतके उल्लेखनीय परिणाम याआधी कधीच कुणी मिळवले नव्हते.

T-cell mutation through CTLA4 protein (डॉ. जेम्स अ‍ॅलिसन यांचे संशोधन)

१९९२ मध्ये अ‍ॅलिसनच्या संशोधनाआधी तासुकु होंजो यांनी PD-1 हे T-cells निगडीत दुसरं प्रथिन शोधलं. बरीच वर्षे कसून शोधल्यावर PD-1 हे CTLA-4 सारखेच पण वेगळ्या प्रकारे T-cell मध्ये ब्रेकचे काम करते, हे लक्षात आले. PD-1 नाकाबंदीने आशादायी परिणाम दाखवल्याने २०१२ मध्ये झालेल्या Clinical development ने विविध प्रकारच्य कॅन्सररूग्णांमध्ये अत्यंत फायद्याचे आहे, हे सिद्ध झाले. त्यामुळे अनेक दुर्धर अशा कॅन्सरवर इलाज निर्माण होण्याची शक्यता दिसू लागली.

Immunotherapy theory behind PD-1/PD-L1(तासुकू होंजो यांचे संशोधन)

Immune checkpoint therapy (आजची आणि उद्याची) :
CTLA-4 आणि PD-1 च्या नाकाबंदीमुळे clinical development नाट्यमयरित्या पुढे गेली. या प्रकारच्या उपचारपद्धतीला “immune checkpoint therapy” म्हणतात. याचे इतर सर्व पद्धतींप्रमाणे adverse side effects असू शकतात. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. वरील दोहोंपैकी PD-1 ही lung cancer, renal cancer, lymphoma and melanoma यासारख्या कॅन्सरसाठी उत्तम काम करते. दोन्हीचे CTLA-4 and PD-1 यांना एकत्र लक्ष्य करणारी पद्धती वापरल्यास melanomaच्या रूग्णांना फायदा झाला आहे. म्हणून अ‍ॅलिसन आणि होन्जो यानी बर्‍याच जणांना वेगवेगळ्या धोरणांना एकत्रितपणे वापरून ट्युमर्सला काढून टाकण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रेरणा दिली आहे. १०० हून जास्त वर्षे शास्त्रज्ञ आपलया रोगप्रतिकारक यंत्रणेला कॅन्सरविरोधात कसे वापरता येईल, याचा प्रयत्न करत होते. या दोघांच्या Checkpoint therapy ने आता cancer treatment मध्ये क्रांतिकारक बदल घडवले आणि कॅन्सरला कसे ताब्यात ठेवावे, याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलवला आहे.

nobel_2018_medicine_Immunotherapy.jpg

(चित्र सौजन्य : https://www.nobelprize.org/)

अजून माहितीसाठी :

  1. James P. Allison यांचे वीकीपीडिया पेज
  2. Tasuku Honjo यांचे वीकीपीडिया पेज
  3. वैद्यकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची अधिकृत वेबसाईट

संदर्भ :

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle