माझे रंगकाम

मैत्रीणवरच जेव्हा मला मोठ्या माणसांसाठी असणार्या कलरींग बुक्सबद्दल कळले( थँक्स लोला!), तेव्हापासून मी ह्या कल्पनेने फार खुष झाले होते. मला माझ्यासाठी एखादं पुस्तक मिळणार! नाहीतर मी आपली मुलाचीच कलरिंग बुक्स घेऊन बसायचे. मुलाला कितपत इंटरेस्ट आला माहीत नाही पण माझा मात्र चांगलाच टिकला होता. शेवटी एक 'मिस्टीकल मंडल' नावाचे पुस्तक घेतले व मुलाच्या रंगीत खडूंनी रंगवायला सुरवात केली. इतकी मजा आली! छान मन लावून, फोकसने चित्र रंगवत बसण्यात काय धमाल येते! हे ते पहिले चित्र.

color3.jpg

मग दुसरे मार्कर्सने रंगवले.
color2.jpg

हे तिसरे आहे ते, अँजी ग्रेसच्या 'क्वर्की' पुस्तकातले आहे. हे कलर्ड पेन्सिल्सने रंगवले. समहाऊ ह्या चित्राचा फोटो काढताना बरोबर रंगछटा येत नाहीत. मी नंतर परत एकदा फोटो काढून बघते. हे फारच किचकट डिझाईन होते. शनीवार ते सोमवार मध्ये रोज येऊन जाऊन अर्धा पाऊण तास असं करत टोटल ३ तासात झाले चित्र पूर्ण. चित्र संपत आल्यावर काय भारी वाटले! :)
color1.jpg

हे तिसरे चित्र, परत एकदा. कारण वर रंग अजिबात नीट आले नाहीत.

IMG_2642(1).jpg

IMG_2644(1).jpg

आणि हे चौथे, आज केले. :)

IMG_2695.JPG

IMG_2697.jpg

तुम्ही विचार करत असाल, अरे बापरे, ही रोज चित्रं रंगवणार व इथे चिकटवणार की काय.. तर कदाचित हो. झालंय असं. मला हातात चिक्कार वेळ मिळतो. परंतू अलिकडे माझ्या लक्षात आले होते की मी बराच वेळ वायाच घालवत आहे. http://maitrin.com/node/288 हा लेख ह्या सगळ्यावरूनच सुचला होता. भरपूर वेळ, भरपूर रिसोर्सेस हाताशी आहेत, पण काहीच भरीव होत नाहीये आयुष्यात असं चित्र दिसू लागले होते. ( म्हणून चित्रांमध्ये रंग भरू लागले! :biggrin: ) मी किती संकल्प ठरवून एकदाही पाळले नाहीयेत गेल्या वर्षभरात, हे आठवले की चिंताग्रस्त होत होत. (अजुनही फळांचा संकल्प हवेतच आहे. )
हे सगळं ठरवून नाही हा प्रोजेक्ट चालू केला. उगीच ते मंडलाचे पुस्तक दिसले म्हणून घेतले. व रंगवताना जाणवले, की ही अ‍ॅक्टीव्हिटी अशी आहे की मी मन लावून, फोकसने चित्र पूर्ण करीनच. समहाऊ माझा इतर ठिकाणी दिसणारा आरंभशूर स्वभावापुढे ही कन्सिस्टन्सी मला एकदम रिलॅक्स करून गेली. हाताशी वेळ आला की पूर्वी उग्गच फेसबुकवर सत्राशेसाठ लिंका वाचत बसण्यापेक्षा मार्कर घेऊन चित्रातला छोटासा का होईना कोपरा रंगवायचा, एव्हढं एकंच ठरवले. आश्चर्यकारक रीत्या मला उत्साह जास्त जाणवू लागला. सगळी कामं झटापट होऊन चित्रासाठी १५ मिनिटं काढणं म्हणजे पार्टीच होती. मला वयाची ३ दशकं उलटल्यावर समजले आहे की मी आळशी नाहीये उलट मला सतत काहीतरी करायचे असते, ते काय करायचे हे न कळल्याने उगीच सगळी धरपकड. पण सध्या एकाच हॉबीवर, अ‍ॅक्टीव्हिटीवर मन केंद्रीत केले आहे. आणि मला खूप छान वाटत आहे! :)

बस्केने हे काय चित्रांची चळत लावली आहे असं वाटत असेल, म्हणून शेअर केली थॉट प्रोसेस. :)
_____________________________________________________________
(०७/२९) आजचे चित्रः माय पर्सनल फेवरिट.. शार्पीज अल्ट्रा फाईन पर्मनंट मार्कर्स वापरले.

color5.1.jpg

०८/१३ -

11891405_10153732941192018_6872257540057987995_o.jpg

०८/१८..

sg.jpg

हे सिक्रेट गार्डनचे चित्र झाले एकदाचे पूर्ण! काय दमवलंय ह्या चित्राने. इतकं प्रचंड डिटेलिंग आहे.. संपता संपेना. पण ह्या कलरिंग अ‍ॅक्टीव्हिटीचा मेन उद्देश पेशन्स वाढवणे असल्याने पुस्तक भिरकावून न देता, केले एकदाचे पूर्ण. (मात्र शेवटी हातघाईला आलेले अगदी दिसून येतंय. पूर्ण चित्रात रात्रीचा निळसर पर्पल अंधाराचे वातावरण निर्माण करावे म्हणून पेन्सिल घेतली.. अन शेवटी अगदीच घाई केली. फराटे उठले. Sad ते ब्लेन्ड होऊ शकतील. पण आता पेशन्स खरंच संपला! निदान आजसाठी. परत नंतर दुरूस्त करीन चित्र.. )

इथे मी जसं चित्रं रंगवत जाईन तसं अपलोड करत जाईन. :)

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle