व्हॅलेंटाईन स्पेशल रोझ फ्लेवर एगलेस केक

आजची व्हॅलेंटाईन डे स्पेशल डिश घेऊन आलेय! खरं तर केक ही काही वेगळी डिश नाही पण आपण स्वतः केलेल्या डिशची मजाच काही वेगळी असते!cake.jpg
घेऊन आलेय व्हॅलेंटाईन स्पेशल रोझ फ्लेवर एगलेस केक... अर्थात होममेड !!!
cake1.jpg
साहित्य:
मैदा 200 ग्रॅम, दोन टीस्पून कोको पावडर, दीड टीस्पून बेकिंग पावडर, एक टीस्पून खायचा सोडा, 200 मिली दूध, दीड चमचा व्हीनिगर किंवा दीड चमचा लिंबाचा रस, 50 ग्रॅम पिठीसाखर, चार चमचे रोझ सिरप, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स आणि 250 ग्राम मिल्कमेड, 100 मिली रिफाईंड सनफ्लॉवर तेल, रेड फूड कलर
मिल्कमेड साठी: अर्धा ली दूध, 200 ग्रॅम साखर ( मिल्कमेड तयार मिळतं पण मी घरी केलं)
आयसिंग साठी: 400 ग्रॅम व्हीप क्रीम

सजावटीसाठी: पायपिंग बॅग, नोझल्स, कलर, सिल्व्हर बॉल्स आणि गोल्डन बॉल्स

कृती:
1)एका कढईत अर्धा लीटर दूध आणि 200 ग्रॅम साखर घेऊन आटवावे. रबडीसारखं व्हायला हवं.
2)तयार मिल्कमेड गार करा, प्लेन नसेल तर मिक्सरला फिरवून घ्या.
3) लिंबाचा रस काढून घ्या.
4) मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, खायचा सोडा एकत्र करून दोन वेळा चाळून घ्या.
5)मिल्कमेड, तेल, पिठीसाखर एकत्र करून फेटा.
6) 200 मिली दूध नॉर्मल टेम्परेचर चे घ्या.
7) त्यात व्हीनिगर किंवा लिंबाचा रस, 1/8 टीस्पून फूड कलर , व्हॅनिला इसेन्स, दोन टीस्पून रोझ सिरप मिसळा.
8) ओव्हन 180 डिग्री ला पाच मिनिटं प्रिहीट करा.
9) कुकरला करणार असाल तर दीड वाटी मीठ कुकरच्या तळाला पसरा, रिंग आणि शिट्टी काढून ठेवा, आणि पाच मिनिटं फुल फ्लेम वर प्रिहिट करा.
10) केक पॉट ला तूप लावून घ्या.
11) पाच नं ला फेटलेल्या मिश्रणात चाळलेला मैदा आणि दूध थोडे थोडे घालून फेटत राहा.
12) सगळे घालून मिश्रण नीट फेटून केकच्या भांड्यात ओता.
13) ओव्हनला 180 डिग्रीवर 30 मिनीटं बेक करा.
14) किंवा कुकरमध्ये मिठावर कुकरची जाळी ठेवून त्यावर केक पॉट ठेवा.
15) झाकण लावून मिडीयम फ्लेमवर 30 मिनिटं ठेवा.
16) ओव्हन किंवा कुकर 30 मिनिटांनी उघडून सुरीचे टोक केकमध्ये घालून बघा.
17) चिकटला तर परत दहा मिनिटं ठेवा.
18) तयार केक बाहेर काढून पंखा न लावता गार होऊ द्या.
19)पूर्ण गार झाल्याशिवाय आयसिंग करू नका.
20) आयसिंग साठी दोन वाट्या (400 ग्रॅम)व्हीप क्रीम घेऊन ते बिटरने 10 मिनीटं फेटावे. क्रीम नाईफवर
घेतल्यावर खाली पडताकामा नये.
21)गार झाल्यावर केक पॉट ताटात उपडे करा.
cake2.jpg
22) कटिंग नाईफ ने केकचे दोन भाग करा.
23) दोन चमचे रोझ सिरप आणि दोन चमचे पाणी एकत्र करा. बेसच्या केकवर हे पाणी सगळीकडे शिंपडा.
24) आता त्यावर क्रिम पसरा. दुसऱ्या केक पीसवर पण हे पाणी शिंपडून तो क्रीम पसरल्यावर त्यावर ठेवा.
25) आता पूर्ण केकला सगळीकडून क्रीम नीट लावा.
26) लावलेले क्रीम प्लेन करा.
27) पायपिंग बॅग मध्ये आवडीचे नोझल लावून त्यात क्रीम भरा आणि केक सजवा. कलर घालूनही तुम्ही केक सजवू शकता.
28) बरेच डेकोरेशन मटेरीयल मिळतं मी त्यातले सिल्व्हर बॉल्स आणि गोल्डन बॉल्स आणून फुलांवर ठेवले.
29) सुंदर असा केक घरच्या घरी तयार आहे.
30) केक फ्रीजमध्ये ठेवा.cake3.jpg
31) असा स्वतः केलेला केक आणि सोबत गुलाब मग काय व्हॅलेंटाईन डे स्पेशल झालाच समजा!!
माझा तर झाला, तुम्ही काय केलंत?

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle