लो कार्ब, हाय प्रोटिन हेल्दी किन्वा सूप

मी सध्या लो कार्ब खाण्यावर भर देत आहे. त्यातून घडलेला हा यशस्वी प्रयोग :)

साहित्य:

- १ वाटी किन्वा
- १ वाटी उकडलेला राजमा ( घरी उकडून किंवा रेडीमेड टिन)
- १ गाजर
- १ लाल सिमला मिरची
- १ झुकिनी
- २ फ्रेश टोमॅटो किंवा कॅन्ड टोमॅटो
- १-२ लसूण पाकळ्या
- १ मध्यम कांदा
- मुठभर पालक ( केल / चार्ड पण चालेल)
- चवी नुसार मीठ, पाप्रिका पावडर किंवा तिखट, मिरपूड, मिक्स हर्ब्स

कृती:

- किन्वा ३ -४ वेळेस स्वछ धूवुन घ्या
- पाणी गरम करायला ठेवून द्या, उकळी आली की त्यात किन्वा घालून ३-४ मिनीटं शिजवा ( त्याला शेपुट फुटायला लागेल)
- किन्वा मधलं पाणी काढून तो मोकळा करून घ्या
- तो पर्यंत कांदा, लसूण, आणि बाकी भाज्या चिरून घ्या
- पॅन मध्ये ऑ ऑ गरम करून त्यात कांदा घालून परतवा
- चांगला परतल्यावर त्यात ल सूण आणि भाज्या एकेक करत घालत रहा
- झाकण लावून भाज्या शिजू द्या पण जास्त नको. थोड्या क्रंची छान लागतात
- आता किन्वा आणि राजमा टाकून छान हलवून घ्या
- चवीप्रमाणे मीठ, तिखट, हर्ब्स घाला
- एक कप पाणी घालून एखादी उकळी येऊद्या
- गॅस बंद करून थोड्या वेळा ने त्यात लिंबू पीळा
- बोल मध्ये सर्व करून गरम गरम ओरपा सोबत एखादी ब्रेड हवी असेल तर घ्या

स्त्रोत--

- pret a manger मध्ये अश्याच धरतीवर व्हेजी चिली म्हणुन एक सूप मिळतं ते मला आवडतं. घरी करायची खुमखूमी स्वस्थ बसू देत नव्हती म्हणुन जरा नेट वर शोधाशोध केली आणि मस्त सूप तयार झालं

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle