Chumash/north ridge trails

ह्या विकेंडला आम्ही घराशेजारच्या ट्रेल्स एक्स्प्लोअर करणे हे फार लाँग ड्यू काम हातात घेतले होते. दोन वर्षं झाली इकडे मुव्ह होऊन. पण आमचं काही होतंच नव्हते ट्रेलवर जाणे. शेवटी ह्या सीझनला इतका पाऊस पडला, सगळी व्हॅली जी एरवी ओसाड व पिवळ्या गवताची असते ती पूर्ण हिरवीगार झाली म्हटल्यावर जाणे भाग होते!

लिटरली घराच्या पलिकडच्या गल्लीत शिरून टोकाला गाडी नेऊन पार्क केली ती ह्या ट्रेलच्या तोंडाशीच. तिकडून असा नजारा दिसत होता.. हिरवाई पाहून डोळे निवले अगदी. ही Chumash trail..

1.jpg

3_0.jpg

4_1.jpg

मागे वळून पाहिले की आमची सिमि व्हॅली दिसत होती..

4A9B1B9F-203B-42F6-B75D-B99A1A1D3025.jpg

5_1.jpg

जसे पुढे जाऊ लागलो तशी माझी तंतरली.. नवरा एकदम खुष असतो अशा ठिकाणी! जितकं अ‍ॅडव्हेंचर तितके भारी! पण मला सतत मागुन माउंटन लायन येतोय किंवा कोपर्यात रॅटलस्नेक बसलाय असे वाटू लागले..

6_0.jpg

2.jpg

थोडे पुढे जाऊन मग मागे फिरलो. कारण आमच्याकडे काठी वगैरे पण नव्हती. आम्ही आपले असेच बघूया म्हणून बाहेर पडलो होतो. म्हटलं इथे यायचे असेल तर जरा नीट अभ्यास करूया. प्राणी दिसले तर काय करायचे वगैरे. खाली जाऊन पाट्या दिसल्या नंतर. त्याचे फोटो काढून ठेवले आहेत.

पण ओव्हरॉल खूप मस्त हिरवे गवत, भरपूर वाईल्डफ्लॉवर्स दिसले.. फार रिफ्रेशिंग!

8_0.jpg

11_0.jpg

9.1.jpg

परत येताना आमच्या कॉलनीमधला लोन सायप्रसचा भारी फोटो मिळाला.. हे कोणते झाड आहे माहित नाही. पण बेएरियातल्या १७ माईल्स ड्राईव्हमधला लोन सायप्रस आठवतो ह्याला पाहून म्हणून ह्याचेही नाव तेच ठेवले आम्ही. एरवी हे झाड, गवत सगळंच डल पिवळं असतं.. पण आता पाहा! Love

12_0.jpg

हे झाले शुक्रवारचे हायकिंग. शनीवारी बाहेरून येताना परत एकदा इच्छा झाली म्हणून अजुन एक ट्रेल पाहायला गेलो. आम्हाला घराजवळून जाणारी ट्रेल कोणती हे शोधायचे होते. ते फायनली सापडले! इथे तर फारच मजा आली! अजिबात अनसेफ किंवा टू मच नेचर/ अ‍ॅडव्हेंचर नसल्याने मला खरोखरच एन्जॉय करता आले.. प्ल्स नीळू होता बरोबर! ही लव्ह्ड इट!!
ही north ridge trail..

13_0.jpg

14_0.jpg

त्या तिथे, पलिकडे.. चौथ्या रांगेत.. आपले घर! :)

21_0.jpg

Lupine की काय नावाचे भारी तुरे फुलले होते जिकडे तिकडे!! ग्रीन आणि पर्पल काय सुंदर कॉम्बो आहे!!

15_0.jpg

16_0.jpg

ती घरं काय खेळण्यातली वाटतायत! पण नाहीयेत. आम्ही तिथे राहतो म्हणून माहित.. नाहीतर विश्वास ठेवणं अवघड होतं.. :ड
17_0.jpg

18_0.jpg

हे काही गुगल फोटोजने स्टायलाईझ्ड करून दिलेले फोटो..
19_0.jpg

20_0.jpg

टाटा ट्रेल! परत येऊच आम्ही!!

22_0.jpg

(मला काही नाही तर पुण्याचय वेताळ टेकडीला समांतर ऑप्शन सापडल्याचा आनंद झालाय! Heehee Dancing )

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle