कुसुम बहर - handcrafted mixed media jewelry

आधीच्या नेकपीसची ऑर्डर पूर्ण व्हायच्या आतच श्रद्धाने बहावा आणि पलाश फुलांचा नेकपीस हवा आहे ही ऑर्डर देऊन ठेवली होती.
आणि तो कसा हवाय ते ही डिट्टेल्वार सांगितलेले. :) फुलांचे डिझाईन असलेल्या ज्वेलरीची संकल्पना मला भन्नाट वाटली.
मनात मग खूप डिझाईन्स गिरक्या घेऊ लागल्या. पण हातातल्या ईतर ऑर्डर्स पूर्ण करुन हे काम हातात घ्यायला अंमळ उशीरच झाला. :sheepish:
वेळ मिळाल्यावर सर्वात आधी दोन्ही फुलांचे काही डिझाईन्स केले. ते श्र ला दाखवून तिची पसंती घेतली.. त्यातले तिने सिलेक्ट केलेल्या डिझाईन्सवर काम सुरु केले. मधले टप्पे श्रद्धाला दाखवत नेकपीस सेट पूर्ण झाले. ह्या ऑर्डरची डिझाईन टू मेकिंग ही प्रोसेस मी खूपच एन्जॉय केलीय Blessed

श्रद्धा, ह्या ऑर्डरसाठी आणि सुंदर कल्पनेसाठी खूप धन्यवाद!!!
श्रद्धाने आयडियेचा किडा डोक्यात टाकलाच आहे तर त्याप्रमाणे अजून काही डिजाईन्सवर काम चालू आहे. दाखवतेच काही दिवसात :ड

पेंडट साईझ ३.५" x २.२५" (साधारण प्लेकार्ड साईझ) | अंदाजे ४.७५" x २.२५" (विथ टसल्स)
कॉर्ड लेंथ १.५ फूट + (अ‍ॅडजेस्टेबल)

02_1.jpg
01_2.jpg

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle