कैरी चा गुजराती पद्धतीचा छुंदा आणि मोरांबा

लागणारा वेळ:
२ तास
लागणारे जिन्नस:
३ किलो मोठ्या कैर्‍या.[लाडु कैरी ,हापुस कैरी चालेल्.शक्यतो आतुन कडक व पांढरी पाहुन घ्यावी.]
ही अशी मोठी लाडु कैरी .एकुण ७ कैर्‍या होत्या.
Gol Kairee_0.jpg

मी सरसकट ३ किलो कैर्‍या आणुन त्याचा फु.प्रो. वर एकसाथ किस केला व या किसाचा छुंदा व मोरांबा दोन्ही केले त्यामुळे एकाच ठिकाणी या दोन्हीची कृति लिहीत आहे.दोन्हीचे साहित्य वेगवेगळे दिले आहे.
३ किलो कैरीचा साले काढुन केलेला एकुण किस ७ वाट्या झाला आहे..

छुंद्यासाठी साहित्य-
हा आहे ५ वाट्या किस.
kairee kis.jpg

८ वाट्या साखर.
२ चमचे लाल तिखट[मी रामदेव वापरले आहे.याचा रंग छान आहे],
चवी प्रमाणे मीठ,
१०-१५ लवंगा,दालचिनी २ इंच,७-८सालासकट वेलची. ह्यात २ चमचे साखर घालुन मिक्सर मधे बारीक पुड करुन घ्यावी
८-१० मिरे,७-८लवंग आणि २ चमचे जाड बडीशोप ,१ चमचा भाजलेले जिरे.
दालचीनी काड्या ४-५
लाल मिरच्या सुक्या ७-८.एकाचे दोन तुकडे करुन आतील बिया काढुन टाका पण देठ तसेच असु द्या.
मोठी मसाल्याची वेलची ४-५ नग.हे आहे मसाला सामान्.पण यात बडीशोप ,लाल सुकी मिरची वेगळी लहान वाटी मधे ठेवली असल्याने ह्या मोठ्या प्लेट मधे दिसणार नाही.
Khada Masala.jpg

क्रमवार पाककृती:
छुंदा-
कैरीचा किस ५ वाट्या व साखर त्याच्या दिड पट ८ वाट्या एका पॅन मधे घेवुन छान मिक्स करावी व मिश्रण गॅसवर ठेवावे.
कैरीच्या आंबटपणावर साखरेचे प्रमाण ठरते .इथे कैरी आंबट होती त्यामुळे मी दिड पटीपेक्षा थोडी जास्त ७ १/२ऐवजी ८ वाट्या साखर घेतली आहे.जर गोडसर असेल तर दिड पटीपेक्षा अर्धी वाटी कमी साखर घेतली तरी चालते.
गॅस मध्यम आचेवर ठेवुन मिश्रण ढवळत रहायचे आहे.
मिश्रणातली साखर विरघळलेली दिसली कि त्यात मसाला पुड्,तिखट,मीठ घाला.लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घाला.छान ढवळा .गॅस कमी करा. लवंग्,दालचीनीचे तुकडे,मिरे त्यात मिसळा .मिश्रण थोडे पळीवाढ झाले कि गॅस बंद करा.कारण थंड झाल्यावर घट्ट होईल.
असा छुंदा तयार झाला.त्याची चव घेवुन "सब कुछ ठिक-ठाक है" याची खात्री करा.
असा हा मस्त आंबट-गोड-तिख,, किरमीजी / ब्राऊन कलर चा छुंदा तयार झाला. वर्षभर फ्रिज बाहेर ठेवला तरी ही टिकतो.
Tayar Chunda_0.jpg
* * * * * *

मोरांबा-
कैरीचा किस २ वाट्या.
साखर ३ १/२ वाट्या.
लवंग ४
हिरवी वेलची ६ .त्याची मिक्सरमध्ये चमचाभर साखरे बरोबर पुड करुन घ्या
केशर काड्या एक चिमुट .
२ वाट्या किस एका स्टीलच्या दब्यात ठेवुन डब्याचे झाकण लावावे.
हा डबा कुकर मधे थोडे पाणी घालुन त्यात ठेवावा.कुकरचे झाकण व शीटी लावुन २ शिट्या काढाव्या .कुकरची वाफ दबली कि डब्यातला किस एका पॅन मधे काढावा त्यात ४ वाट्या म्हणजे किसाच्या दुप्पट साखर घालुन मिश्रण छान ढवळुन मध्यम गॅस वर ठेवावे .साखर विरघळली कि गॅस कमी करुन वेलची पुड,लवंग व केशर घाला.मिश्रण पळीवाढ झाले कि गॅस बन्द करा.हा आहे तयार झालेला मोरांबा.
Moramba.jpg
थंड झाल्यावर बरणीत भरा.
मोरांबा थंड झाला कि त्यात केशर एसेन्स ही घालता येईल्.त्याची चव व वास छान येतो.

अधिक टिपा:
१]जर उन्हातला करायचा असेल तर --
छुंदा व मोरांबा वेगवेगळ्या पातेल्यात किंवा काचेच्या बरणीत साखर मिसळुन उन्हात ठेवावा .बरणीला झाकण न लावता ,वर पातळ कापड बांधावे.७-८ दिवसात साखर विरघळली .कि त्यात इतर मसाला पदार्थ घालुन पुन्हा उन्हात ठेवावे.रोज उन्हात ठेवण्यापुर्वी मिश्रण चमच्याने ढवळुन ठेवावे.१२ ते १५ दिवसात उन्हातला ,टिकाऊ छुंदा वा मोरांबा तयार होतो.अर्थात उन्हाचे व त्याचबरोबर साहित्याचे प्रमाण यावर किती दिवस लागतील ते अवलंबुन आहे. २]कमी प्रमाणात लगेच खायला करायचा असेल तर मावेत /ओव्हन मधे ही सुंदर होतो.
छुंद्यामधे चव व वास आवडत असेल तर सबंध बडीशोप ही घालता येईल.
३] लैरी च्या आंबट पणावर साखरे चे प्रमाण कमी वा यापेक्षा जास्त ठेवा.इथे घेतलेली गोल कैरी आंबट असते.

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle