केळ्याचे वेफर्स - सुगरणपणाची सुरसुरी

फार फार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा मी शाळेत होते आणि जेव्हा आम्ही डोंबिवली पश्चिमेला रहात होतो, तेव्हा स्टेशनजवळच्या फिश मार्केटपाशी एकजण संध्याकाळी गरमगरम बटाटा वेफर्स करत असे. ही माझी वेफर्सची पहिली ठळक आठवण आहे. याआधी वेफर्स केवळ हलवायाकडे काचेच्या बरण्यांतून पाहिले होते आणि तेच खाल्ले होते. पण लक्षात राहण्यासारखं काही नव्हतं त्यांत.

मग कधीतरी एकदा केळ्याचे वेफर्स खाल्ले. त्यांची ती काहीशी गोढीळ चव त्यावेळी आवडली नव्हती हे देखिल आठवतंय.

हळूहळू हॉट चिप्सची दुकानं आली. माटुंगा मार्केटमधले विविध प्रकारचे केळा वेफर्स आवडायला लागले. पिवळे, पांढरे - मिरीवाले, पांढरेच पण लाल तिखट मिक्स केलेले, पिकलेल्या केळ्याचे वेफर्स आणि खोबरेल तेलात तळलेले वेफर्स. सगळेच आवडीचे. केळ्याचे वेफर्स इतके आवडायला लागले की बटाटा वेफर्स खालच्या क्रमांकावर घसरले.

गेले काही दिवस केळ्याचे वेफर्स करायची सुरसुरी अगदी दाटून आली. दादरच्या रानडे रोडवर मनोहरच्या चौकात एक वेफर्सवाला हातगाडीवर दणादण केळा वेफर्स बनवत असतो. बघायला खूप मजा येते. ते असणार कुठेतरी मनात. तरीही ऐकूण स्वतःच्या औकातीची कल्पना असल्यानं तशीच गप्प बसले. मनातील दाह शांत करायला युट्युबवर वेफर्स करण्याचे व्हिडिओ पाहिले आणि त्यामुळे उलटाच परिणाम होऊन काल कच्ची केळी आणलीच. आणि आता सकाळी उठून शेवटी केलेच वेफर्स.... मस्त झालेत बरं.

आमच्या मावशी केळ्याची सालं सोलत आहेत :
419c3ecf-691f-47b1-b4d5-91f1a9ec98f7.jpg

केळी किसून तयार आहेत :
d22f3ba5-2b0a-4a54-a2ab-7daba8a6aeed.jpg

b8d91bb0-cce0-48e7-89de-47af0de00ff5.jpg

तेलात पडली :
456c8cbd-1fae-4b95-bfc9-ee81da3bd6c4.jpg

वेफर्स तळून झाल्यावर चाळणीत हलवले :
34e34bf4-ec2a-4f70-bb1c-9967476a90fe.jpg

मसाला आणि मसाला लावलेले वेफर्स :
50f0a88d-6915-4d88-932b-4098e3ad57c0.jpg

92235607-693d-4dc8-b536-761d6df774a1.jpg

पुढच्या पाच मिनिटांत आलात तर मिळण्याचे चान्सेस आहेत.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle