दुधी आणि रवा-इडली चा उपमा

साहित्य:

- १ वाटी इडली-रवा
- साधारण २ वाटी किसलेला दुधी - ( दुधी किसण्याआधी त्याचा छोटासा तुकडा तोंडात टाकून बघावा, कडू असेल तर वापरू नये )
- १ लाल सुकी मिरची
- १ हिरवी मिरची,
- कडीपत्ता
- १ इंच किसलेलं आलं
- १ कांदा बारीक चिरलेला
- चवी नुसार मीठ, साखर आणि लिंबू


कृती:

- इडली रवा स्वच्छ धुवून घ्या
- त्यातले सगळे पाणी काढून टाका
- कुकरच्या भांड्यामध्ये इडली-रवा आणि किसलेला दुधी एकत्र करा. ह्या डब्ब्यात पाणी आजिबात टाकू नका

IMG_1042.JPG
- धुतलेला रवा आणि दुधी ह्यांचा ओलसरपणा फक्त असूद्या
- कुकर मध्ये पाणी टाकुन, हा डब्बा ठेवून २ शिट्ट्या होउ द्या
- कुकर थंड झाला की हे मिश्रण एका पसरट ताटामध्ये पसरून थंड होऊ द्या
- फोर्क ने हे मिश्रण जरा सुटं सुटं करा ( इथपर्यंत आदल्या दिवशी करून फ्रिज मध्ये पण ठेवता येईल, दुसर्‍या दिवशी फक्त फोडणी बाकी ठेवायची- ब्रेफा, डब्बात पटकन करून देता येईल)

IMG_1043.JPG
- कढई मध्ये तेल तापले कि मोहरी - जिरे- हिंगाची - कडिपत्ता फोडणी करा
- बारीक चिरलेला कांदा , लाल मिरची, हि मी, आलं एका मागे एक टाकत कांदा लालसर होईपर्यंत चांगलं परतून घ्या
- मग त्यामध्ये हे मिश्रण आणि मीठ घालून परत परता. आवडत असेल तर चिमूटभर साखर ही
- दणदणीत वाफ आली की गॅस बंद करा

- प्लेट मध्ये वाढतांना ह्या वर लिंबू, कोथिंबीर घाला आणि आवडत असेल तर सोबत बारीक शेव आणि लिंबाची फोड घेऊन गरमागरम आस्वाद घ्या

IMG_1046.JPG
ही डिश लहान मुलांना ही आवडते हे मी नोटिस केलं आहे.
ब्रेकफास्ट, डब्ब्या साठी हे अजून एक ऑप्शन.

टिप--
- ही सेम रेसिपी इडली-रवा ऐवजी तांदुळ वापरून ही करू शकता. त्यासाठी तांदुळ ३-४ तास पाण्यात भिजवावा लागेल. आणि नंतर हातानेच त्याला चुरून बारीक करू शकता किंवा मिक्सर मध्ये फक्त एकदाच घुर्र .. जाडसर कणी सारखा असला पाहिजे. बाकी कृती सेम.

मी दोन्हीचाही करुन पाहिला. दोन्हीही छान लागतात पण मला तांदळा पेक्षा इडली-रवा वापरुन केलेला जास्त आवडला.

स्त्रोत- वहिनी च्या साउथ इंडिअन मैत्रिणी ने तिला शिकवली, तिने आई ला आणि आई ने मला :)

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle