रंग माझा वेगळा- भाग एक

रंग माझा वेगळा- भाग एक

मॅडम कशा आहात ?

नेहमीप्रमाणे तीच त्या मेसेंज कडे लक्ष दिल . कोण विचारताय हे सवयीने बघण्याकरता तिने प्रोफाइल ओपन करून बघितल तर एक यंग मुलगा छानसा गोडसा. मोजके दोनच फोटो अख्या प्रोफाइल मध्ये. जास्त फोटो हि नाही आणि एकंदर प्रोफाइल वर जास्त काहीच लिहिलेल नाही पोस्ट नाहीत. सुना सुना प्रोफाइल. तिने उत्तर दिल " छानच" . थोड्यावेळाने विचारल गेलं "मॅडम एक रिक्वेस्ट करू का ? अहो जाहो केलं तर काही बर नाही वाटत मी तुम्हाला अग तुग केल तर चालेल का ?

नेहमीप्रमाणे च प्रश्न होता खर तर त्यात काही वेगळं नाहीच त्यामुळे तिने पण " हो चालेल कि " सांगितलं आणि मग थोडा वेळाने थांबत थांबत अंदाज घेत घेत थोड्याफार गप्पा सुरु झाल्या . ठरलेले प्रश्न विचारून झाले . उत्तर पण झाली . बोला ना वरून बोल कि . त्या दिवशी तिचा मुड पण बरा होता . नाहीतर एरवी अशा ठराविक प्रश्नांना ती उत्तर देत नसे पण आज तिला वाटलं देऊया उत्तर त्यात काय . थोडक्यात काय आज त्याच नशीब जोरावर होत तर

काय आवडत कुठल्या विषयावर बोलायला आवडेल विचारलं गेलं आणि एक एक प्रश्न उत्तरांची लड उलगडत गेली . दोघांनाही जाणवलच नाही किती वेळ गप्पा मारत होतो ते. खर तर त्यांच्यात परिस्तिथी -वयात काही म्हणजे काहीच साम्य नव्हतं. अगदी काही म्हणजे काहीच नाही पण गप्पा रंगल्या खरं . त्याने दिलखुलास पणे कबुली दिली "मला आवडलय तुमच्याशी आय मीन तुझ्याशी गप्पा मारायला ".

तिने पण स्वतःला मनातल्या मनात सांगितलं" हो मला पण आवडतंय कि ". भले त्याच्यासमोर लेखी कबुली दिली नसली तरी. आणि स्माईल साईन देऊन त्या दिवशीच चॅट तिने बंद केलं. "चल . बाय. टेक केयर "नेहमीचे सूर आळवून झाले आणि ती विचार करायला लागली. काहीतरी पॉझिटिव्ह छान फिलिंग आलं होत . सगळी मनातली मरगळ निघून गेली होती . नीट शब्दात व्यक्त करू शकत नव्हती ती पण खूप छान वाटत होत एवढं नक्की . मस्त गुणगुणावस वाटत होत त्या दिवशी जरा शांतपणे झोपली ती . दुसऱ्या दिवशी ऑफिस मधून आल्यावर रात्री लॉगिन झाली आणि ती तिच्या नकळतच त्याच्या मेसेज ची वाट बघत बसली . येईल का त्याचा मेसेज ? नक्की येईल त्याला पण आपल्याशी बोलायला छान वाटत होतच कि. सांगत नव्हता का ?

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle