रंग माझा वेगळा-भाग ४

रंग माझा वेगळा-भाग ४

निधीने रात्री झोपता झोपताच ठरवलं सकाळी उठल्या उठल्या विराजला तिला जे काही सांगायचं होत ते सांगून टाकायचं" त्याप्रमाणे सकाळी उठल्या उठल्याच निधीने कळवून टाकलच .

" हे बघ विराज काही गोष्टी माझ्या कडे माझ्या अशा पर्सनल आहेत ज्या मला तुला सांगायच्या नाहीयेत . त्यामुळेच मला कुठलेही पर्सनल प्रश्न विचारू नकोस. अगदी काहीच नको . कारण मला तुला काहीच सांगायचं नाहीये . तुला जर का हे मान्य असेल तर आणि तरच आपण पुढे बोलूया नाहीतर आत्ताच थांबूया . मला माहिती आहे तुला हे कदाचित आवडणार नाही पण माझाही नाईलाज आहे . तुला जर का हे मान्य असेल तर आपण आपलं बोलणं पुढे नेऊया नाहीतर इथेच थांबूया "

त्याला एकदाचा मेसेज केला आणि ती शांत शांत झाली . नंतर शांत डोक्याने ऑफिस ला गेली . आज ती विशेष उत्साहात होती कारण तिला माहिती होत आज संध्याकाळीच कळणार होता तिला तिच्या आणि विराजच्या फ्रेंडशिप चा निर्णय . याच्या पुढे सगळं सोप्प होणार होत कारण फ्रेंड्स च नातं राहणार नव्हतं . ती खूप खुश होती दिवस भर .

संध्याकाळी घरी आल्यावर शांतपणे जेवण करून ती नेहमीच्या वेळेला लॉगिन झाली तो तिच्या मनाप्रमाणे / तिच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय वाचण्यासाठीच पण तिचा तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना

त्याच एक तासापूर्वीच उत्तर आलच होत " मला तुझा निर्णय पूर्णपणे मान्य आहे . तुझ्या पर्सनल आयुष्याशी मला काही म्हणजे काहीच देणं घेणं नाही . त्या बद्द्ल मी तुला कधीच काही विचारणार नाही . खुश ? आता एकदा मस्त स्माईल दे बघू "

निधी चा तिच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता . ती काय वाचायला कुठल्या अपेक्षेने गेली होती आणि स्माईल देऊन लॉगऑऊट झाली

तिच्या मनातून विचार जातच नव्हते. कुठंल्या मातीचा बनलाय हा ? . काहीतरी वेगळाच होता तो नक्कीच . मला पर्सनल काही विचारू नका . मला काही सांगण्यात इंटरेस्ट नाही -बोलण्यात इंटरेस्ट नाही असं सांगितलं कि आतापर्यत बोलणं तिथल्या तिथे थांबत होत . पण हे काय अस ? असं कसा हा ? विचार करता करता मध्यरात्री तिला वाटलं "आणखीन काही त्याने लिहिलंय का बघूया तरी "म्हणून ती लॉगिन झाली तर " आलीस का परत . मला खात्रीच होती तू येशीलच परत " म्हणून महाशय हजर . "अरे काय रे इतक्या रात्री मध्यरात्री कुणी ऑनलाईन असत का रे.?

"मग तू नाहीस का ? " लगेच त्याच उत्तर

काय बोलू या माणसाशी कस बोलू विचार करताच तिने एक सुटकेची मोट्ठी स्माईल दिली आणि लगेच

" आता कस . आता माझी रात्र आणि उद्याचा चा दिवस मस्त जाणार बघ . " याच करता मी थांबलो होतो ग जे न मागता मला मिळाल " या त्याच्या वाक्यावर मात्र ती खळखळून हसली

"चल झोप आता . खुश ना ? " विचारून झाल आणि हसत हसच ती लॉगऑऊट झाली
काही तरी वेगळाच होता मुलगा . जरा शांत डोक्यानेच घेतलं पाहिजे . माणस वाचायला /ओळखायला शिकायला पाहिजे आणि विराजला तर नक्कीच . त्याच बोलणं जास्त मनावर घ्यायच नाही . बोलायचं त्याचाशी जरा खूलूनच. असा विचार करून ती झोपायला गेली

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle