हवाई - बिग आयलंड - लावा हाईक

मी काही प्रवासवर्णन लिहिण्यात कुशल नाही त्यामुळे या ट्रिपचे वर्णन अगदी थोडक्यात असेल. :)

२०१७ डिसेंबरला बिग आयलंडला जाऊन आलो तर परवा ते फोटो पीसीवर टाकले. हुश्श्य.

हवाईला खुपजणी जात असालच. पण लावा ट्रेक केल्याचे कोणाकडुन वाचले नाही म्हणुन म्हटले थोडे फोटो टाकुया म्हणजे जरा वेगळं काहीतरी पहाता येईल.

बिग आयलंडच्या अनेक टूर्सपैकी एक लावा हाईक. ४-५ मैलाच्या असतात. व्हॅननी जायचे, हाईकच्या तोंडाला उतरायचे, दोन-अडीच मैल चालत जायचे लावा पहायचा व परत यायचे. छान उन असेल तर मजा येते. (गरम पण होतेच). पण त्यामुळे लावा दगड चकाकत असतो व डोळ्याचे पारणे फिटते व आपण पृथ्वीवर आहोत असे वाटत नाही.

तर, गाईडने बजावले होते... आपण चालत चालत जिवंत लावापाशी जाणार आहोत जिथे दगडाखाली तुम्हाला लावा दिसेल. कोणीही दुसर्‍या वाटेने जायचे नाही कारण इथे सारखा लावा येऊन थंड होत असतो. तो ताजा लावा असेल तर दगड तुटेल व तुम्ही लावात पडाल. आता सुरुवातीलीच असली ड्यान्जर सुचना ऐकल्यावर कोणाची बिशाद भलत्याच वाटेने जायची? अर्थात पहिले २ मैल ठीक होतं कारण तो जुना लावा होता व खाली निर्जीव होता.

भयंकर चढ उतारावर चालुन,दमुन, पाणी पिऊन पिऊन जसे जिवंत लावापाशी पोचू लागतो तेव्हा सल्फरचा नाक बंद करायला लावणारा वास यायला लागतो, दगडातुन वाफा येऊ लागतात, हवा एकदम गरम होऊन जाते, बूट वितळतील का काय असे वाटु लागते व थोडी भिती वाटु लागते. त्यात पुन्हा गाईडने सुरुवातीला अजुन एक भयंकर सुचना (दम) देऊन ठेवलेली असते... "जपून चाला. दगडावर पडु नका. हा दगड नव्हे तर तुटलेल्या काचाच आहेत जणु. पडलात तर काचांचा चुरा तुमच्या अंगात घुसेल असेच समजा"...

त्यामुळे आता सप्तपदीत नवर्‍याच्या पावलावर पण इतके बरोब्बर पाऊल ठेवले नसेल तेवढे गाईडच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण चालायला लागतो. त्यात चढऊतार फार. मग शेवटी, फाटलेल्या पण घट्ट झालेल्या दगडांच्या भेगांतुन लावाची जळती रेश दिसू लागते. अगदी भसाभसा लावा वहात असेल असे नाही, ते आपल्या नशिबावर अवलंबुन आहे की किती लावा पहाया मिळेल. तर तो लावा घाबरत घाबरत पाहुन, त्यात आपण पडलो तर?? अशी उगाचच कल्पना करुन, फोटो काढुन आपण परत फिरतो.

नमुन्यादाखल काही फोटो.

IMG_0586.jpg

IMG_0589.jpg

IMG_0591.jpg

IMG_0595.jpg

IMG_0600.jpg

IMG_0602.jpg

IMG_0612.jpg

IMG_0615.jpg

IMG_0623.jpg

IMG_0624.jpg

एकुण हा ट्रेक आयुष्यभर न विसरता येणारा अनुभव आहे.

---------------
तर, जिवंत लावाप्रदेशावरुन हेलिकॉप्टरमधुन सैर अजुन एक न विसरता येणारा अनुभव. इथे मानव अर्थातच जाऊ शकत नाही. सारखे कुठुनतरी छोटेमोठे उद्रेक होत असतातच. पण त्या जमीनीचे भितीदायक सौन्दर्य डोळ्यात मावत नाही. त्या दिवशी लावा फार उसळत नव्हता पण तरी जे दिसले ते पुरेसे होते.

लावा कोपर्‍याकोपर्‍यात खदखदतोय.

IMG_0122.jpg

IMG_0132.jpg

IMG_0133.jpg

लावा विहीरीच्या वरची जमीन.
IMG_0130.jpg

IMG_0131.jpg

थोडा उतारावरुन हळुहळु समुद्राकडे जातोय.
IMG_0148.jpg

लावा समुद्रात येऊन येऊन बनलेला, रहायला शक्य नसलेला भुभाग.
IMG_0142.jpg

दुसरा एक कीलावे ज्वालामुखी रात्री पहायला जातात. हे पण पहायलाच हवे. रात्री लावाचा उसळत्या गडद्द केशरी रंग इतका प्रखर असतो की त्याची प्रभा आकाशात पण पडते.

IMG_0104.jpg

IMG_0106.jpg

IMG_0107.jpg

अजुन एक ट्रेक केला आहे ज्याचे फोटो द्यायचे आहेत. तुर्त सध्या इतकेच.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle