रंग माझा वेगळा-भाग ७

रंग माझा वेगळा-भाग ७

एक दिवशी तर त्याने कमालच केली रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस . त्या दिवशी तर दोघेही एकमेकांच्या मेसेज ची वाट बघत असायचे . पण त्या दिवशी काही तो दिवसभर फिरकलाच नाही . निधीचा जीव कासावीस झाला रागाचा पारा चढला आणि "बस झाली तुझी नाटक . आता मी काही बोलत नाहीये तुझ्याशी "असा मेसेज टाकून ती लॉग आऊट झाली . तिला स्वस्थ तरी बसवताय का ? रात्री जरा उशिरानेच डोकावली तर याचा मेसेज "ओये बेब . कशी ग तू ? एवढं काय ग. दिवसभर जरा ड्राइव्ह करत होतो ना . मग कसा लिहिणार मेसेज ? तूच तर म्हणतेस ना ड्राइव्ह करताना मेसेज लिहू नको असं ?

' हो बरोबर आहे पण दिवसभर ड्राइव्ह ?" तिने आश्चर्याने विचारलं

"हो . जरा कामाला गेलो होतो . पण रागवायचं नाही काही . चल आता तू एक वेळ ठरव त्यावेळी आपण बोलूया . प्रॉमिस "

रात्रीची जेवण उरकल्यानंतर ची वेळ दोघांनाही सूट होती त्यामुळे तीच वेळ ठरली . काही दिवस इमाने इतबारे वेळ सांभाळली गेली मग परत पहिले पाढे पंचावन्न . कधी खूप दमलो ग . झोप येतेय हि कारण तर नेहमीचीच . मग तिची चिडचिड . कशाला वेळ ठरवलीस ? पाळायची नव्हती तर .
निधीने ठरवलं जाऊदे बोलायचंच नाही त्याच्याशी खूपच नाटक वाढली आहेत याची . एके दिवशी संध्याकाळी ५ वाजल्या पासून जी ती लॉग आउट झाली ती दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता उगवली मुद्दामून . तर हा साईन्स द्वारा धो धो रडत होता . तिच्या मनात आलं बर झालं " मला त्रास दिला तेव्हा मला कस वाटलं आता समजेल त्याला "

लगेच दोन मिनिट्स मध्ये हजर " कसली आहेस ग तू ? काय झालं काय ? "

"अरे जरा बर नव्हतं" . "
"जवळ जवळ शंभर वेळा डोकावलो तुझ्या प्रोफाइल वर "

" त्यात काय झालं मागच्या रविवारी मी पण अशीच डोकावले तुझ्या प्रोफाइल वर "

" म्हणून त्याचा वचपा काढलास ? "

"नाही रे असं नाही काही" .

"बर ते जाऊदे . मला तुला एक सांगायचं आहे"

लगेच त्याने विषयच चेंज करून टाकला "मी खूप बकवास वागतो का ग निधी ?"

" हो काही काही वेळा वागतोस आणि नाही पण . हेच बघ ना परवाच्या रविवारी दिवसभर मेसेज नाही . काही नाही. मग मी रागावले नाही का ? पण का असं विचारतोस ? "

"तुला ना एक गोष्ट सांगयचेय खूप दिवसांपासून . कुणालाच सांगितली नाहीये . तुलाच फक्त सांगणारे "

'असं काय आहे ? "तिने धास्तावून विचारल
विराजने सांगायला सुरवात केलं " आमच्या सोसायटीत ना एक काकी रहातात निधी . त्यांची बहीण कलकत्त्यात असते . तिला मुलं होत नव्हतं बरेच वर्ष . तर त्या काकी मला अप्रोच झाल्या आणि म्हणाल्या "विराज तू यंग आहेस . देखणा आहेस. हुशार आहेस . माझी बहीण ना कलकत्याला असते तिला मूल होत नाहीये तिच्या करता तू स्पर्म डोनेट करशील का ?. मी तुला डॉकटर कडे घेऊन जाईन . तुझा सगळा खर्च करेन. पण हे तू कर रे माझ्या बहिणीकरता . माझी बहीण खूप आनंदी होईल रे.आयुष्यभर तुझे उपकार विसरणार नाही "

विराज म्हणाला " मी खूप विचारात पडलो ग निधी . काय करू म्हणून . बर हे मला माझ्या मॉम- डॅड ला पण सांगायचं नव्हतं . यु नो ना माझा स्वभाव? मला दुसऱ्याला आनंद द्यायला आवडतो . मला चांगलं वाटत .खूप सुकून मिळतो मला . त्यामुळे मी खूप विचार केला आणि तयार झालो . मग त्या आंटी नीच पुढाकार घेऊन सगळं केलं . मी स्पर्म डोनेट केलं ते त्यांच्या बहिणीच्या गर्भाशयात इंजेकट केलं आणि गेल्या महिन्यात तिला ट्विन्स पण झाले ग. हि बातमी मला कोणाला तरी सांगायची होती . पण कोणाला सांगू ?. मॉम - डॅड पासून तर हि बातमी लपवून ठेवलेय . मला त्यांना सांगताच येणार नाही . म्हणून तुला सांगितली . पण आता मला खूप हलकं वाटतंय तुला सांगून . "

निधी थक्क होऊन वाचत राहिली . तिला काही सुचेना. काय लिहावं ते . पण लगेच सावरून त्याला बूस्ट करण्यासाठी मेसेज केला " विराज यु आर ग्रेट . हॅट्स ऑफ टू यु . एवढा मोठ्ठा डिसिजन आई-वडिलांना न सांगत घेणं सोप्प नाहीये . खरंच . तुझ्या बद्दल माझ्या मनात आदर निर्माण झालाय. मी आता काहीच जास्त एक्प्रेस करू शकत नाहीय . पण तू ग्रेट तर आहेसच पण मनाने पण खूप मोठ्ठा आहेस . मला आता काही सुचत नाहीये काय बोलावं ते. तू काहीतरी वेगळा आहेस सगळ्यांपेक्षा. हटके " निधी पुढे काही बोलूच शकली नाही आणि नेहमीप्रमाणे त्याला " बाय -टेक केयर " करत लॉगआऊट झाली पण तिच्या डोक्यात विचारांचं थैमान घोंघावत होत

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle