गाजर मटार भाजी

आला ग बाईss.. आला ग बाईss..

गोड गुलाबी हलकीशी थँडी घेऊन एकदाचा हिवाळा आला.. सोबत लालसर गाजर अन हिरवेगार मटार घेऊन आला..

काल गाजर हलव्याचा मुहूर्त.. मग आज गाजर मटार ही माझी फेवरीट भाजी केली..

साहित्य -
४-५ गाजर किसून घेतलेले (टेक वन कॅरट अँड किस इट!)
1 वाटीभर कोवळे।मटार
1 कांदा मध्यम आकारात चिरून
चवीनुसार तिखट, मीठ
थोडीशी हळद
फोडणीसाठी - तेल, मोहरी, जिरे, हिंग अन कडीपत्ता
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती -
कढईत फोडणीच साहित्य वापरून चरचरीत फोडणी करून घ्या
त्यात कांदा घालून कच्चटपणा जाईपर्यंत परता
ह्यात मटार घालून मिक्स करा अन 2 मिनीट झाकण ठेवा.. नाहीतर मटार एकदम टापूर टिपूर करत सगळीकडे नाचतील! :winking:
ह्यात चिमूटभर हळद, तिखट घालून नीट हलवून घ्या म्हणजे रंग छान येईल
मग गाजराचा किस घालून परता अन थोडासा पाण्याचा हबका मारुन झाकण ठेवून शिजू द्यात

मस्त गोडसर तिखट अशी भाजी तय्यार! भाकरी,पोळी / नुसतीच कशीही बेस्टच लागते

अयांव गाजराची भाजी कोण करतंय, उगा असं करून अपमान करू नये वगैरे घरचा आहेर मिळतो पण ऐकतेय कोण  68

तवा इथं बी असं काय म्हणू नगासा .. नैतर नन्तर हलवा गोड लागणार नई :P

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle