जपान मधील १४०० वर्षांपुर्वीचे मंदिर : आसाकुसाचे सेन्सोजी मंदिर

आसाकुसा सेन्सोजी मंदिर

आसाकुसा (浅 草) हा जपानच्या ताइतो, टोउक्यो मधील एक जिल्हा आहे, जो “बोधिसत्व कॅनाॅन” देवतेला समर्पित केलेले बौद्ध मंदिर “सेन्सोजी”साठी प्रसिद्ध आहे.

१)सेन्सोजी मंदिराचा इतिहास

सेनोजी मंदिराची कथा ६२८ सालची आहे. जेव्हा हिनोकुमा हामानारी आणि हिनोकुमा ताकेनरी असे दोन भाऊ सुमिदा नदीत मासेमारीसाठी गेले होते. त्या दिवशी त्यांना मासे सापडले नाहीत, परंतु त्यांच्या जाळ्यात त्यांना एक असामान्य वस्तू सापडली: एक छोटी सोन्याची मूर्ती. साध्या मच्छीमारांना पुतळ्याचे मूल्य समजले नाही आणि त्यांनी ती मुर्ती पाण्यात टाकुन दिली! आणि त्यांची बोट वळवुन ते पुन्हा मासेमारी करायला लागले. पुन्हा त्यांच्या जाळ्याला मुर्ती लागली. अनेक वेळा त्यांनी ती मुर्ती दूर फेकली, तरीही ती त्यांच्या जाळ्याला पुन्हा पुन्हा लागली. शेवटी त्यांनी ती मुर्ती घेतली आणि गावच्या स्थानिक प्रमुख हाजी नो मात्सुची यांना दाखवली. त्यांनी ती मुर्ती कॅनॉन दैवतेची आहे ते ओळखले आणि त्या तिघांनी मिळून त्या मुर्तीची स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी मुर्ती साठी एक लहान गवताची झोपडी बनविली. पुढे, हाजी नो मत्सुचीने स्वत: च्या घरालाच मंदिर बनविले आणि हेच मंदिर पुढे सेन्सोजी म्हणून नावारुपास आले.

२)येथे काय पहावे: मुख्य इमारती

अ) कामीनारिमोन: हे या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. या गेटच्या दोन्ही बाजूला जपानी पवन देवता आणि वीज देवता उभ्या आहेत. या गेट मधून आत गेल्यानंतर लगेचच नाकामिसे नावाचे मार्केट लागते. इथे तुम्हाला किमोनो (जपानी पारंपारीक पोषाख), जपानी खाद्यपदार्थ, पंखे, शोभेच्या वस्तू, अशा एकनाअनेक प्रकारच्या पारंपारीक गोष्टी मिळतील.

0D940B58-F0FD-45F7-8EA5-3887B0DAE558.jpeg

ब) सेन्सोजी मुख्य मंदिर : नाकामिसे मार्केट मधून सरळ आलात तर तुम्ही मुख्य मंदिरासमोर पोहोचता. मुख्य मंदिराला जपानी भाषेत होंदो किंवा कॅनॉन-डू देखील म्हटले जाते कारण येथेच कॅनॉन देवतेची मूर्ती स्थापित केली गेली आहे. परंतु, प्रत्यक्षात मूळ मुर्ती इथे ठेवलेली नाही. ६२८ मध्ये सुमिदा नदीत सापडलेली मूर्ती ६४५ पासून लोकांच्या नजरेतून लपवून ठेवण्यात आली आहे.

CAEAAB2E-6D2E-4E45-AD56-22A421E55E11.jpeg

क) पाच मजली पॅगोडा: हा पॅगोडा 942 मध्ये बांधला गेला होता. दुसर्‍या महायुद्धात हवाई हल्ल्यात त्याचा नाश झाला आणि त्यानंतरच्या सध्याच्या ठिकाणी पुन्हा बांधले गेले. असं म्हटले जाते की या पॅगोडा मध्ये बुद्धांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत.

C51D7B53-55AE-4E0E-A54C-4C4F910A504F.jpeg

ड) आसाकुसा मंदिर: सेन्सोजी मंदिरास भेट दिल्यानंतर मंदिराच्या पूर्वेकडे गेलात की जवळच तुम्हाला आसाकुसा मंदिर दिसेल. हे सेन्सोजीपेक्षा खूपच लहान आणि शांत आहे, परंतु मनोरंजक तपशिलांनी भरलेले आहे. हे मंदिर दोन मासेमार भाऊ आणि गावप्रमुख या तिघांना समर्पित आहे ज्यांनी १४०० वर्षांपूर्वी सेन्सोजीची स्थापना केली.

822D381F-2738-494C-BF95-BFA53E2C2B3F.jpeg

3. भेट देण्याची वेळ:

मुख्य सेन्सोजी मंदिर सकाळी ६.०० ते सायंकाळी ५.०० दरम्यान खुले असते. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान मात्र मंदिर ६:३० वाजता उघडते. हे मंदिर वर्षभर चालु असते.

४)इथे कसं जायच :

सेन्सोजीचे मुख्य प्रवेशद्वार कामीनारिमोन गेटमार्गे आहे. इथे येण्यासाठी रेल्वेच्या गिन्झा सबवे लाइन, आसाकुसा सबवे लाइन आणि तोबु स्कायट्री लाइन उपलब्ध आहेत.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle