महिला दिन २०२०

mahiladin2020.png

सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

एकविसाव्या शतकाचं दुसरं दशक संपलं तरीदेखील अनेकविध क्षेत्रात प्रकर्षाने जाणवणारी महत्त्वाची बाब म्हणजेच स्त्री -पुरुष असमानता. मग ती नोकरी -उद्योगात स्थान मिळवण्यासाठी असो, आर्थिक मोबदला - बढती बाबतीतली असो किंवा अगदी कळत- नकळत केला जाणारा भेदभाव. ह्याच विषयाला अनुसरून यंदाच्या महिलादिनाचं सूत्र ठरवण्यात आलंय : #EachforEqual

महिला दिनाची साइटच पहा-
https://www.internationalwomensday.com/Theme

An equal world is an enabled world.
Individually, we're all responsible for our own thoughts and actions - all day, every day.
We can actively choose to challenge stereotypes, fight bias, broaden perceptions, improve situations and celebrate women's achievements.
Collectively, each one of us can help create a gender equal world. Let's all be #EachforEqual.

दरवर्षीप्रमाणेच यंदाही आपण महिला दिन वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करणार आहोत. एकमेकींकडून प्रेरणा, प्रोत्साहन घेताना स्वतःला थोडा वेळ देत, खेळ खेळत आपल्याच अंतरंगात डोकावून पाहणार आहोत.

ह्या उपक्रमांमध्ये भरभरून सहभाग घेत, गप्पा मारत यंदाचा महिला दिन साजरा करूया.
रोजच्या जीवनात समानता साधण्यासाठी , #EachforEqual सूत्र प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने चर्चा होऊ दे आणि होत राहू दे!

यावर्षीच्या महिला दिन उपक्रम संयोजनात लीलावती विशाखा या दोघींनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांचे मन:पूर्वक आभार.. Thumbsup Flowers

Keywords: 

उपक्रम: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle