एप्रिलमधे नी या ब्रॅण्डला पाच वर्षे पूर्ण झाली.
पाच वर्षपूर्तीसाठी म्हणून बरेच काय काय योजले होते. ते करोनाच्या संकटामुळे गळपटले.
सगळ्या निरूत्साही वातावरणात पाचव्या वर्षपूर्तीचे कलेक्शनही रखडले.
पण आता आपले आपणच बळ एकवटून कामाला लागण्याशिवाय पर्याय नाहीये.
पाचव्या वर्षपूर्ती कलेक्शनची तयारी जोरात चालू आहे.
लवकरच पाचवे वर्षपूर्ती कलेक्शन तुमच्या समोर येईल.
पाचव्या वाढदिवसानिमित्त माझ्या तारकामाच्या प्रवासातले टप्पे माझ्या पेजवर, फेसबुक भिंतीवर, इन्स्टावर टाकले होते.
हे काम करत राहणे हा माझ्या आनंदाचा भाग आहे. दाखवणे हा ही. ते सर्व टप्पे याच धाग्यात आहेत.
वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू केलेली ही नवीन गोष्ट.
मिक्स मिडीया आर्ट
म्हादेई सिरीजमधले माझे पहिले वॉल आर्ट.

